no images were found
शेततळेधारक शेतकऱ्यांसाठी मत्स्यपालन प्रशिक्षणाचे आयोजन
कोल्हापूर : जिल्ह्यामध्ये होतकरु व इच्छुक मत्स्यपालक शेतक-यांना शेततळ्यांमध्ये मत्स्यशेती करून जोडधंद्यातून मत्स्योत्पादन वाढविणे व आर्थिक सुबत्ता वाढविण्याच्या दृष्टीने प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात येणार आहे. जिल्ह्यातील जास्तीत-जास्त शेततळेधारक शेतकऱ्यांनी मत्स्यपालन प्रशिक्षणाचा लाभ घेऊन मत्स्य शेती करावी आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले आहे. मत्स्यपालन प्रशिक्षण बुधवार दि. 21 सप्टेंबर रोजी हॉटेल निसर्ग, बुरंबाळी, तुळशी धरण, राधानगरी. गुरुवार दि.22 सप्टेंबर रोजी कृषी विज्ञान केंद्र, तळसंदे येथे तर शुक्रवार दि. 23 सप्टेंबर रोजी शाह वाचनालय, भुदरगड येथे दुपारी 12 ते 2 या वेळेत होणार आहे.
या प्रशिक्षणामध्ये मत्स्यशेती बाबत माहिती, यशस्वी मत्स्यपालकांची माहिती, किसान क्रेडीट कार्ड व पथदर्शी मत्स्यव्यवसाय याबाबत माहिती देण्यात येणार आहे. मत्स्यव्यवसाय वाढीसाठी जास्तीत-जास्त शेततळेधारकांना योग्य मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण, मत्स्यबीज निवड, संचयन, संगोपन, संवर्धन, मत्स्य हाताळणी-वाहतुक विक्री व मस्त्य मुल्यवर्धीत पदार्थ निर्मिती तसेच इतर अनुषंगीक बाबी यांची तांत्रिक माहिती देण्यात येणार आहे. या करिता सहाय्यक आयुक्त कार्यालयातील तांत्रिक अधिकारी, यशस्वी मत्स्यपालक, मत्स्य खाद्य कारखानाधारक यांच्यामार्फत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.