Home क्राईम खड्डे चुकवण्याच्या नादात भीषण अपघात; तिघांचा जागीच मृत्यू

खड्डे चुकवण्याच्या नादात भीषण अपघात; तिघांचा जागीच मृत्यू

0 second read
0
0
227

no images were found

खड्डे चुकवण्याच्या नादात भीषण अपघात; तिघांचा जागीच मृत्यू

     नांदेड : जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यातील राजवाडी गावाजवळ खड्डा चुकवताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने आठवडी बाजाराठी हिमायतनगरकडे जाणारा टेम्पो पलटी होऊन भीषण अपघात झाला आहे. या अपघातात ३ व्यवसायिकांचा जागीच झाले असून २५ जण जखमी झाले आहेत.

रस्त्यावरील खड्डा चुकवताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने टेम्पो पलटी झाला आणि अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. अपघाताची भीषणता एवढी होती की, या अपघातात ३ जणांचा जागीच मृत्यू झाला असून तब्बल २५ जण जखमी झाले आहेत. जखमींना मुदखेड येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. हाफिज मोहम्मद हुसेन, मोहम्मद रफिक मोहम्मद आमीनसाब, मोहम्मद चांद मोहम्मद मिरासाब यांचा मृत्यू झाला आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In क्राईम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

शिवाजी विद्यापीठात शिवराज्याभिषेक दिन

शिवाजी विद्यापीठात शिवराज्याभिषेक दिन   कोल्हापूर,(प्रतिनिधी):- शिवाजी विद्यापीठात शि…