no images were found
तंत्रज्ञान अधिविभागामध्ये TECHFEST 2K24 राष्ट्रीय स्तरीय तांत्रिक प्रकल्प स्पर्धेचे आयोजन
कोल्हापूर (प्रतिनिधी): शिवाजी विद्यापीठाच्या तंत्रज्ञान अधिविभाग आणि शिवाजी विद्यापीठ इन्स्टिट्यूशन्स इनोव्हेशन कौंसिल , शिवाजी विद्यापीठ रिसर्च अँड डेव्हलपमेंट फाउंडेशन (SUKRDF), इंडियन इन्स्टिटयूट ऑफ केमिकल इंजिनीअर्स आणि इंडियन सोसायटी फॉर टेकनिकल एज्युकेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दि. ३०/०३/२०४ रोजी TECHFEST 2K24 ही राष्ट्रीय स्तरावरील तांत्रिक प्रकल्प स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
विद्यार्थ्यांच्या संशोधन वृत्तीस चालना मिळावी तसेच अभियांत्रिकी क्षेत्रातील नवनिर्मितीचा सर्वसामान्य लोकांसाठी वापर व्हावा या भूमिकेला अनुसरून या स्पर्धेचे नियोजन केले होते. या वेळी लोकउपयोगी नवनिर्मित प्रकल्पांना बक्षीस व प्रमाणपत्रक देऊन गौरवण्यात आले व विद्यार्थांना नव संशोधन करण्यास प्रवृत्त व मार्गदर्शन करण्यात आले. या प्रकल्प स्पर्धेमध्ये ऐकून ३१० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. या प्रकल्प स्पर्धेमध्ये शिवाजी विद्यापीठाचे प्र. कुलगुरू प्रो. डॉ. पी. एस. पाटील यांनी विद्यार्थ्यांना
मार्गदर्शन केले. विज्ञान, तंत्रज्ञान व औद्योगिक क्षेत्रातील प्रगती संशोधनांवर अवलंबून असून,वायू प्रदूषण, इंधन तुटवडा, आधुनिक उत्पादनांची आयात अशा अनेक भविष्यातील मोठ्या समस्यांना शाश्वत संशोधनाद्वारे मात करता येते असे मत ही त्यांनी यावेळी व्यक्त केले. तसेच विद्यार्थ्यांनी उद्योजक बनून संशोधनाच्या आधारे नवसुधारित उत्पादने, सेवा प्रक्रिया, डिजिटल तंत्रज्ञानांची निर्मिती करून समाजाला विकसित करावे असे आव्हानही यावेळी प्रो. डॉ. पी. एस. पाटील यांनी विद्यार्थ्यांना केले.
वाहनांन पासून होणारे वायुप्रदूषण या जागतिक समस्येवर शाश्वत संशोधनाद्वारे मात करता येत असून संशोधनातुन नवनिर्मित उत्तम दर्जाची यंत्र निर्मिती करता येते. याचे सखोल मार्गदर्शन विभागाचे संचालक प्रो. डॉ. एस. एन. सपली यांनी यावेळी केले.
औद्योगिक क्षेत्रामध्ये विज्ञान व तंत्रज्ञानाची गरज असून अभिनव संकल्पनेच्या माध्यमातून उद्योजक बनता येते याबद्दल मार्गदर्शन कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे, मयुरा स्टील प्रा. लिमिटेड कोल्हापूर चे मॅनेजिंग डायरेक्टर श्री. रवी डोली यांनी केले. या कार्यक्रमाला शिवाजी विद्यापीठाचे प्र. कुलगुरू प्रो. डॉ. पी. एस. पाटील, अधिविभागाचे संचालक
प्रो. डॉ. एस. एन. सपली, SCIIL, SUK चे संचालक डॉ. एस. डी. डेळेकर, स्पर्धेचे समन्वयक डॉ. डी. एम. नांगरे, श्री. ए. ए. डुम, श्री. ए. बी. मडावी तसेच अधिविभागाच्या सर्व शाखांचे समन्वयक, श्री. पी. ए. प्रभू, डॉ. आर. जे. देशमुख, डॉ. एस. बी. चव्हाण, डॉ. आय. एस. उडचन, श्री. एम. एस. साळुंखे, विभागातील सर्व प्राध्यापक उपस्थित होते. सदर प्रकल्प स्पर्धेसाठी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू श्री. डॉ. डी. टी. शिर्के प्र.कुलगुरू श्री. डॉ. पी. एस. पाटील सर व कुलसचिव श्री. डॉ व्ही. एन शिंदे सर यांचे प्रोत्साहन व सहकार्य लाभले आहे.