no images were found
नाले सफाई कामाचा प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांच्याकडून आढावा
कोल्हापुर : मान्सूनपुर्व नालेसफाई कामाचा प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी आज आढावा घेतला. यावेळी त्यांनी शहरातील लहान व मोठया नाल्यांची सफाई मे महिन्याच्या 15 तारखेपर्यंत पूर्ण करा. विभागीय कार्यालयातील नियंत्रण अधिकाऱ्यांनी नालेसफाईची फिरती करुन तपासणी करण्याच्या सूचना या बैठकीत देण्यात आल्या. ही बैठक निवडणूक कार्यालयात घेण्यात आली. यावेळी अतिरिक्त राहुल रोकडे, उप-आयुक्त साधना पाटील, पंडीत पाटील, सहाय्यक आयुक्त संजय सरनाईक, कृष्णा पाटील, मुख्य लेखा व वित्त अधिकारी सुनील काटे, मुख्य लेखापरिक्षक कलावती मिसाळ, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, जल अभियंता हर्षजीत घाटगे, इस्टेट ऑफिसर सचिन जाधव, वर्कशॉप प्रमुख चेतन शिंदे उपस्थित होते.
प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी प्रारंभी महापालिकेने 465 कोटीची विक्रमी वसुली केल्याबद्दल नगररचना, घरफाळा, पाणीपुरवठा व वसुलीच्या सर्व विभागाच्या अधिकारी व कर्मचा-यांचे अभिनंदन केले. तद्नंतर आढावा बैठीमध्ये नाल्यांची सफाई करताना काढलेला गाळ दुसऱ्या दिवशी उठाव करण्याच्या सूचना दिल्या. पावसाळयापुर्वी शहरातील ड्रेनेज लाईनची स्वच्छता करण्यासाठी मोठ्या क्षमतेचे सक्शन कम जेटींग मशीन भाडयाने घेऊन ड्रेनेज लाईनची स्वच्छता करुन घ्यावी अशा सूचना दिल्या. पावसाळयापुर्वी औषधांचा साठा पुरेसा उपलब्ध करुन ठेवा. झूम प्रकल्पाच्या ठिकाणी जेसीबी मशीन आवश्यकतेनुसार देण्यात यावे. मशीन ना दुरुस्त झाल्यास तातडीने दुरुस्त करुन याठिकाणी देण्यात यावे. झूम प्रकल्पाच्या ठिकाणी नव्याने बांधण्यात आलेल्या कचरा प्रक्रिया प्रकल्प लवकरात लवकर सुरु करा. दैनंदिन महापालिकेचे ॲटो टिप्पर, डंपर व इतर मशनरी किती तास काम करते याची तपासणी करण्याच्या सूचना अतिरिक्त आयुक्तांना दिल्या. टाकाळा येथे इनर्ट मटेरियल टाकण्याचे नियोजन करा. यासाठी आवश्यक ती कामे पुर्ण करुन घ्या. नगरोत्थान योजनेअंतर्गत मंजूर कामापैकी किमान पाच रस्ते 15 मे पर्यंत पुर्ण करुन घेण्याच्या सूचना शहर अभियंता यांना दिल्या.