Home सामाजिक महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय हटगर समाजाची कार्यकारणी जाहीर

महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय हटगर समाजाची कार्यकारणी जाहीर

0 second read
0
0
28

no images were found

महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय हटगर समाजाची कार्यकारणी जाहीर

पंढरपूर– राष्ट्रीय हटगर कोष्टी समाज संस्थेतर्फे आयोजित राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय हटगर समाजाच्या अध्यक्षपदी दत्तात्रय लंगोटे यांची तर उपाध्यक्षपदी अजय व्हनुगरे यांची एकमताने निवड करण्यात आली तसेच कार्यकारिणीत अकरा जणांची निवड करण्यात आली. सदर नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. किशोर गिरवलकर यांच्या हस्ते निवडीचे पत्र देण्यात आले. यावेळी नूतन अध्यक्ष श्री. लंगोटे यांनी समाजाच्या विकासासाठी आमची कार्यकारणी कटीबद्ध असून सर्वांच्या सहकार्याने समाजातील प्रलंबित अनेक प्रश्न तडीस नेऊ अशी ग्वाही दिली.
या कार्यकारणी बैठकीत शिवानंद मारडकर, संतोष व्हनबट्टे, दत्तात्रय काणे, अवधूत कलगुंडे, सागर मिणचे,निलेश दिवटे यांच्यासह मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते. निवडीनंतर नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. शेवटी आभार उपाध्यक्ष अजय व्हनुगरे यांनी मानले.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

महायुतीला भरभरून मतदान केलेल्या नागरिकांचे आभार, खासदार धनंजय महाडिक..

महायुतीला भरभरून मतदान केलेल्या नागरिकांचे आभार, खासदार धनंजय महाडिक..   कोल्हापूर (प…