
no images were found
सायबर आंतरराष्ट्रीय परिषदेत विविध पैलूनी विचार मंथन कोल्हापूर ( प्रतिनीधी ) : – सायबर येथे चालू असलेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या दुसऱ्या व समारोपाच्या दिवशी समान संधी आणि समस्या यावर सहभागी परदेशी तज्ञांनी प्रदीर्घ चर्चा केली. श्रीलंका व मॉरिशस इथून प्रत्यक्ष हजर असलेल्या विविध विषयाच्या प्राध्यापकांनी विचार मांडले. पहिला सत्रात श्रीलंकेच्या डॉ के कलाई नाथन यांनी हरित अर्थकारण आणि हरित मूल्यांवर आधारित आर्थिक संबंध या संदर्भात चर्चा केली.
मॉरिशसच्या डॉक्टर अमिताबाई यांनी प्रदूषण आणि त्याचा मानवी आरोग्यावर होणारा गंभीर परिणाम यासंबंधी मांडणी केली. जन्मताच निर्माण होणाऱ्या कमतरता व त्यातून उद्भवणारे दिव्यांगत्व याबाबत त्यांनी माहिती दिली.
ऑनलाइन सत्रात श्रीलंकेच्या वावुनिया विद्यापीठाचे कुलगुरू डॉ टी मंगलेश्वरन यांनी भारताने सुपर पॉवर बनण्यासाठी मनुष्यबळाचे स्थान व परिस्थिती यासंबंधी मांडणी केली. मनुष्यबळाचा भांडवल म्हणून वापर किती कार्यक्षमतेने भारत करत आहे, करू शकतो याची चर्चा केली. कौशल्य विकासातून प्रगती हे भारताचे वैशिष्ट्य असे ते म्हणाले. भारतीय रोजगार परिस्थितीबद्दल आढावा घेत त्यांनी श्रीलंका व भारत यांच्या तुलनात्मक विचार मांडला. भारताने रोजगार संधीत बदल केलेल्या प्रगतीबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.
डॉक्टर सुलक्षणा भिवाजी मॉरिशस यांनी *व्होका* अस्थिरता अनिश्चितता जटिलता आणि द्विधा परिस्थिती या चार मुद्द्यांचा विस्तार केला.
हरित मनुष्य संसाधन या विषयावर त्यांनी मांडणी करताना, कर्मचाऱ्यांना प्रतिष्ठा आणि दूरगामी फायदा होणारे बक्षीस दिले पाहिजे, असा मुद्दा सांगितला. समन्वय करत असताना आवश्यक लवचिक धोरण हे महत्त्वाचे हे त्यांनी स्पष्ट केले.
कृत्रिम बुद्धिमत्तेचे आव्हान लक्षात घेता मानवी मर्यादा आणि यांत्रिकता यांचा पुनर्विचार करणे आवश्यक आहे असेही त्या म्हणाल्या. मॉरिशसच्या विराज फुलेना यांनी न्यायदानातील विलंबाने व्यवस्थेतील उणिवा याबद्दल भाष्य केले .
यावेळी त्यांनी मॉरिशस मधील प्रसिद्ध न्यायाविना रखडलेल्या विलंब झालेल्या लोकप्रिय केसेसचा उल्लेख केला. बऱ्याचदा चुकीचे आरोपाखाली व्यक्तीला पकडले जाऊन न्याय प्रक्रिये ढकलले जाते आणि अपराध न करता ही शिक्षा ठरवली जाते. त्यावेळी कायदा व्यवस्थेत बदल किती महत्वाचे आहेत असे प्रतिपादन त्यांनी केले .
दुपारच्या सत्रात प्रशस्ती पत्र व स्मृतिचिन्ह वाटप करण्यात आले. यावेळी डॉ.
एस एस जामसांडेकर यांच्याकडून परिषदेचा आढावा प्रस्तुत करण्यात आला शेवटी प्राध्यापक मधुरा माने यांनी आभार व्यक्त केले
एकूणच परिषदेमध्ये संशोधनाचे महत्त्व तसेच संशोधन विषयातील देवाण-घेवाण ही विद्यार्थी शिक्षक आणि संस्था यांच्या पातळीवरती खूप मोठ्या प्रमाणावर होणे आवश्यक आहे याबद्दल सर्वांचे एकमत झाले.
नवीन शैक्षणिक धोरणानुसार अशा प्रकारच्या खुल्या विचाराने एकत्र येणे आणि ही एकता टिकून टिकवून त्यातील योग्य आणि व्यवहार्य पर्यायांना घेऊन पुढे जाणे अत्यंत गरजेचे आहे हे सर्वांच्या लक्षात आले. आता पुस्तकी ज्ञानापेक्षा व्यवहारी आणि कौशल्यपूर्ण कल्पनाशक्ती ने युक्त ज्ञानाची गरज या देवाण-घेवाणीतुनच भागवली जाऊ शकते असे सर्वत्र चित्र दिसू लागले आहे.हे या आंतरराष्ट्रीय परिषदेचे मोठे यश ठरले आहे .