no images were found
कलाकारांनी दिल्या रंगीबेरंगी होळी सुरक्षित साजरी करण्यासाठीच्या स्किन केअर टिप्स
देशभरात होळी हा रंगांचा सण म्हणून हर्षोल्हासाने साजरा केला जातो. परंतु या उत्सवी वातावरणात कृत्रिम रंगांमुळे त्वचेचे नुकसान होऊ नये यासाठी त्वचेची काळजी घेणे देखील महत्त्वाचे आहे. ही बाब ध्यानी घेऊन सोनी सबवरील कलाकार त्यांचे स्किनकेअरचे गुपित सांगत आहेत. या रंगांच्या सणाचा आनंद घेत असताना आपल्या त्वचेची काळजी ते कशी घेतात, बघू या.
‘आंगन – अपनों का’ मालिकेत तन्वीची भूमिका साकारणारी अदिती राठोड म्हणते,“होळीच्या रंगांचा आनंद लुटताना आपल्या त्वचेची काळजी घेतलीच पाहिजे. एक अभिनेत्री म्हणून मी एक साधे पण प्रभावी पथ्य सांभाळते. आपल्या त्वचेवर मी भरपूर मॉइस्चराइझर आणि सनस्क्रीन लावून घेते. तर, होळी आनंदात साजरी करू या पण त्वचेची काळजी देखील घेऊ या आणि आपल्या मनातील झळाळी आपल्या परफॉर्मन्सला देखील बहाल करू या.”
आकाश अवस्थीची भूमिका करणारा समर वेरमानी म्हणतो,“होळी अगदी तोंडावर आली आहे, आणि इतर सर्वांप्रमाणे मी सुद्धा या रंगांच्या सणाची आतुरतेने वाट बघत आहे. एक अभिनेता म्हणून मला माझ्या त्वचेची विशेष काळजी घ्यावी लागते. रंग खेळायच्या आधी मी आपल्या त्वचेवर मॉइस्चराइझर आणि सनस्क्रीनचा व्यवस्थित थर लावतो. दाढीला ऑलिव्ह ऑइल किंवा बियर्ड ऑइल लावून माझ्या दाढीची देखील काळजी घेतो. दिवसा उन्हात होळी खेळताना लांब बाह्यांचे कपडे घातले पाहिजेत, जेणेकरून त्वचा रापत नाही. रंग खेळून झाल्यानंतर रंग काढण्यासाठी मी सौम्य क्लीन्झर , सौम्य साबण आणि कोमट पाणी वापरतो. आणि स्नान झाल्यानंतर पुन्हा मॉइस्चराइझर लावतो. सर्वात उत्तम म्हणजे ऑर्गनिक रंगांनी होळी खेळणे!”
‘पुष्पा इम्पॉसिबल’ मालिकेत दीप्तीची भूमिका करणारी गरिमा परिहार म्हणते, “चेहऱ्यावर खोबरेल तेल लावून मगच मी होळीचे रंग खेळायला जाते. रंगांचे डाग राहू नयेत यासाठी माझा हा रामबाण उपाय आहे. असे केल्याने मनसोक्त रंग खेळून झाल्यानंतर देखील रंग सहज साफ होतात. हा सण जबाबदारीने साजरा करू या, आणि ही खातरजमा करू या की, हा सण केवळ आनंदमय पद्धतीने नाही, तर विचारपूर्वक साजरा करू या- स्वतःसाठी आणि आपल्या आसपासच्या सृष्टीच्या दृष्टीने देखील. होळीच्या शुभेच्छा!”
‘वागले की दुनिया’ मालिकेत सखी वागलेची भूमिका करत असलेली चिन्मयी साळवी म्हणते,“एक अभिनेत्री म्हणून होळीसारख्या सणात माझी त्वचा खूपच प्रभावित होते. त्यामुळे रंग आणि आनंद साजरा करत असताना त्वचेची काळजी घेण्यासाठी मी नेहमी सोप्या पण प्रभावी उपायांवर भर देते. रंग खेळायला जाण्याअगोदर मी मी त्वचेवर भरपूर खोबरेल तेल लावते, ज्यामुळे त्वचेचे रक्षण आणि पोषणही होते. आणि मग त्यावर मॉइस्चराइझर लावते, ज्यामुळे या उत्सवी वातावरणात माझी त्वचा कोमल आणि तेजस्वी राहते.”