Home मनोरंजन उल्का गुप्ता आणि करण वोहरा दिसणार नव्या मालिकेत

उल्का गुप्ता आणि करण वोहरा दिसणार नव्या मालिकेत

10 second read
0
0
19

no images were found

उल्का गुप्ता आणि करण वोहरा दिसणार नव्या मालिकेत

 

झीवरील आगामी मालिका मैं हूँ साथ तेरे’ ही प्रेक्षकांना एका सिंगल आई जानवीच्या प्रवासामध्येज्यात एका आईला आई आणि वडिल अशा दोन्ही भूमिका बजावताना किती त्याग करावा लागतो ते पाहायला मिळेल. ग्वालियरच्या पार्श्वभूमीवर घडत असलेल्या ह्या कथेमध्ये जानवी आपला मुलगा किआनसोबत राहते आणि तो तिच्या जगाच्या केंद्रस्थानी आहे. त्यांच्यातील अतिशय घट्ट नात्याव्यतिरिक्तही किआनला आपल्यापेक्षा आपल्या आईच्या आयुष्यातील त्याच्या वडिलांची कमतरता भासत राहते. हा प्लॉट पुढे विकसित होत जाईल जेव्हा जानवी एका श्रीमंत व्यावसायिक आर्यमनला भेटेल आणि मग ते दोघे एकाच छताखाली काम करू लागतील.

टेलिव्हिजनची झांसी की रानी म्हणून ओळखली जाणारी लोकप्रिय अभिनेत्री उल्का गुप्ता ह्या मालिकेत जानवीची भूमिका साकारताना दिसून येईल. ती एक 25 वर्षीय सिंगल आई असून शक्ती आणि निर्धाराचे मुर्तिमंत उदाहरण आहे. ती एक परफेक्शनिस्ट असून कुठल्याही तक्रारीशिवाय आपल्या सगळ्‌या जबाबदाऱ्या पार पाडत आहे. आर्थिक चणचणसामाजिक कलंक आणि आपल्या परिवाराच्या समर्थनाचा अभाव या गोष्टी असल्या तरी आपला मुलगा किआन याला सर्वोत्तम आयुष्य प्रदान करण्याचे तिच्या आयुष्याचे ध्येय आहे. तिच्यासोबत डॅशिंग करण वोहरा आर्यमन ह्या 27 वर्षीय मेहनती व्यावसायिकाची भूमिका साकारत असून तो लहानाचा मोठा होत असताना आपल्या वडिलांच्या प्रेमासाठी पारखा झाला होता.

उल्का गुप्ता म्हणालीझी टीव्हीकडे परत येणे हे मला माझ्या घरी परतण्यासारखे आहे. प्रथमच ह्या मालिकेत मी एका आईची आणि तीसुद्धा एकमेव पालकाची भूमिका निभावत आहे आणि त्याबद्दल मी अतिशय रोमांचित आहे. मी आजपर्यंत केलेल्या भूमिकांपेक्षा ही खूपच वेगळी असून ती उलगडून पाहण्यासाठी मी उत्सुक आहे. मला माझा हा परफॉर्मन्स त्या सर्व मातांना समर्पित करायचा आहे ज्या एकटीने अगदी खंबीरपणे आपल्या मुलांचे संगोपन करून त्यांना लहानाचे मोठे करत आहेत.”

करण वोहरा म्हणाला, “आर्यमानची भूमिका साकारताना मी अतिशय उत्साहात आहे. तो काळजी घेणारा एक संवेदनशील पुरूष असून त्याला हे कळून चुकले आहे की आपल्या प्रेमाला जिंकण्यासाठी त्याला तिच्या मुलाची परवानगी मिळवणे गरजेचे आहे आणि त्यामुळे त्या छोट्‌या मुलासोबत तो नाते बनवण्याचा प्रयत्न करत आहे. आम्ही हल्लीच प्रोमोचे चित्रीकरण केले आणि उल्का आणि छोट्‌या निहानसोबत काम करताना खूपच मजा आली. ते दोघेही अतिशय हुशार आणि समर्पित आहेत. आमच्या तिघांचे अगदी कमी कालावधीमध्ये छान नाते जमले. मला आशा आहे की प्रेक्षकही त्यांच्या प्रेमाचा वर्षाव आमच्यावर करतील.

वडिलांच्या प्रेमाला पारखा असूनही आर्यमनने किआनसोबत सुंदर नाते निर्माण केले आहे. काय किआन जानवी आणि आर्यमन यांच्यातील दुवा बनेलकाय जानवी आणि किआन यांच्या आयुष्यातील हरवलेला तुकडा आर्यमन आहेप्रेमआयुष्य आणि नातेसंबंधांकडे अगदी निरागस दृष्टीने पाहण्यासाठी ह्या जागेकडे लक्ष असू द्या.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली!

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली! मुंबई : गेल्या महिन्याभर…