no images were found
दिव्यांग वित्त व विकास महामंडळाच्या योजनांच्या अर्जासाठी संकेतस्थळ उपलब्ध
कोल्हापूर : राज्यातील 18 ते 60 वयोगटातील दिव्यांगांना स्वयंरोजगारासाठी अल्प व्याज दराने कर्ज स्वरुपात अर्थसहाय्य करण्याकरीता महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळामार्फत राज्य शासनाची वैयक्तिक थेट कर्ज योजना व राष्ट्रीय दिव्यांगजन महामंडळाची दिव्यांग स्वावलंबन कर्ज योजना राबविण्यात येते. या महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या कर्ज योजनांचा जास्तीत जास्त दिव्यांग व्यक्तींना लाभ मिळावा, यासाठी महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळाच्या www.mshfdc.co.in या संकेतस्थळावरील डाऊनलोडमध्ये कर्ज योजनांचे अर्ज व महामंडळाचे माहितीपत्रक https://mshfdc.co.in/index.php/२०१३-०४-१२-१३-२०-५६ या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आले आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त आणि विकास महामंडळाच्या जिल्हा व्यवस्थापकांनी दिली आहे.