no images were found
महाराष्ट्रात नेमकं कोण बाजी मारणार शिंदे, ठाकरे की पवार?
निवडणूक आयोगाने आज लोकसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा करणार असल्याचं जाहीर केलं आहे. देशात एकीकडे ‘एक देश, एक निवडणूक’ चर्चा रंगलेली असताना दुसरीकडे लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम नेमका कसा असेल याची उत्सुकता आहे. महाराष्ट्रात जर आजच्या घडीला लोकसभा निवडणूक झाली तर नेमकं काय चित्र असेल याचा अंदाज यातून समोर आला आहे.
जर महाराष्ट्रात आजच्या घडीला लोकसभा निवडणूक झाल्यास एनडीएला म्हणजेच भाजपा, शिंदे गट, अजित पवार आणि अन्य यांना 48 पैकी 45 जागा मिळतील. तर महाविकास आघाडीला फक्त 3 जागा मिळतील असा अंदाज आहे. महाविकास आघाडीत काँग्रेस, उद्धव ठाकरे गट, शरद पवार गट यासह इतर पक्ष आहेत.
मागील निवडणुकीच्या एनडीएच्या जागांमध्ये 7 ने वाढ होईल. तर महाविकास आघाडीच्या जागा 6 ने कमी होतील. तर अन्य जागा 1 ने कमी होईल. मागील लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत एनडीएच्या मतांमध्ये 4.6 टक्क्यांची वाढ होईल. तर दुसरीकडे महाविकास आघाडीच्या मतांमध्ये घट होईल. ही घट वजा 4.1 इतकी असेल.
2019 मध्ये भाजपाला 27.8 टक्के मतं आणि 23 जागा मिळाल्या होत्या. ही टक्केवारी यावर्षी 38.6 टक्के आणि जागा 29 असतील असा अंदाज आहे. शिंदेंच्या शिवसेनेला 2019 मध्ये 16.8 टक्के मतं आणि 12 जागा मिळाल्या होत्या. यावेळी त्यांची मतांची टक्केवारी 15.3 असेल आणि 10 जागा मिळतील असा अंदाज आहे. तसंच मागील निवडणुकीच्या तुलनेत अजित पवार गटाची मतांची टक्केवारी 1.1 ने आणि जागा 4 ने कमी होतील. पण जागा 4 ने वाढतील.
दरम्यान उद्धव ठाकरे गटाच्या मतांच्या टक्केवारीत वाढ होईल. पण जागा मात्र 1 मिळेल असा अंदाज आहे. शरद पवार गटाला मागील निवडणुकीत 8.8 टक्के मतं आणि 2 जागा मिळाल्या होत्या. यावेळी त्यांना फक्त 1 जागा मिळेल असा अंदाज आहे. तसंच काँग्रेसही फारशी चांगली कामगिरी करणार नाही. काँग्रेसला 14.6 टक्के मतं आणि 1 जागा मिळेल असा अंदाज आहे.
ओपिनियन पोलमध्ये सहभागी झालेल्यांना तुम्ही कोणत्या पक्षाला मत देणार असा प्रश्न विचारण्यात आला. यावर 60.8 टक्के लोकांनी आम्ही एनडीएला म्हणजेच भाजपा, शिंदे गट, अजित पवार आणि इतरांना मत देऊ असं उत्तर दिलं. तर 30.5 टक्के लोकांनी महाविकास आघाडीला मत देऊ असं सांगितलं आहे. तसंच 8.7 टक्के लोकांनी इतरांना मत देऊ असं म्हटलं आहे.