no images were found
इंद्रधनुषमध्ये शिवाजी विद्यापीठ उपविजेता शोभायात्रेसह तीस कलाप्रकारांचे पारितोषिक वितरण
छत्रपती संभाजीनगर : गेल्या अनेक वर्षापासून इंद्रधनुष्य युवक महोत्सवाचे विजेतेपद जिंकण्याची परंपरा मुंबई विद्यापीठाने अबाधित राखली. तर कोल्हापुरच्या शिवाजी विद्यापीठाने अनपेक्षितपणे पुणे विद्यापीठाला मागे टाकून उपविजेतेपदी मुसंडी मारली.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात ’इंद्रधनुष्य राज्यस्तरीय युवक महोत्सवाचा समारोप व पारितोषिक वितरण समारंभ शुक्रवारी (दि.१५) नाटयगृहात झाला. या महोत्सवात शिवाजी विद्यापीठ संघाने शोभायात्रेसह विविध कलाप्रकारांत प्रथम क्रमांक पटकावून उपविजेतेपदापर्यंत मजल मारली.
कलेला सामाजिक कार्याची जोड द्या : सोनाली कुलकर्णी
समाजमाध्यमांसह परंपरागत माध्यामातील कलावंताना आज चांगले दिवस आले आहेत. आजुबाजुला असलेल्या माणसांकडून प्रेरणा घेऊन उत्तम कलावंत व्हा. तसेच कलेला सामाजिक कार्याची जोड द्या, असा मोलाचा सल्ला प्रख्यात अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी दिला. मराठवाडा ही पाहुण्यांना आपुलकीची वागणूक देतो, याचा प्रत्यय यजमान विद्यापीठाने दाखवून दिल्याचा उल्लेख ही त्यांनी केला. सुमारे २५ मिनिटांच्या भाषणात त्यांनी आपल्या जडणघडणीतील अनेक प्रसंग सांगितले. आपल्या संपुर्ण चित्रपट कारकिर्दीत रमाबाई आंबेडकर व डॉ.मंदाकिनी आमटे यांच्या भुमिका आपणास माती आणि समाजाशी नाळ कायम ठेऊन गेल्याचेही अभिनेत्री सोनाली कुलकर्णी म्हणाल्या.
– चॅम्पीयन ट्रॉफी सर्वसाधारण विजेता संघ (राधाबाई वसंतराव रांगणेकर सर्वसाधारण विजेता संघ फिरते चषक द्वारा श्री.विनायक दळवी) – मुंबई विद्यापीठ, मुंबई
– रनर्सअप ट्रॉफी (सर्वसाधारण उपविजेता संघ ) (चंद्रकांत यशवंत बांदेकर सर्वसाधारण उपविजेता संघ फिरते चषक द्वारा श्री आदेश बांदेकर) शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर
१. संगीत विभाग उत्कृष्ट संघ – मुंबई विद्यापीठ
२. नृत्य विभाग उत्कृष्ट संघ – स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड
३. नाटय विभाग उत्कृष्ट संघ – मुंबई विद्यापीठ, मुंबई
४. वाड्ःमय विभाग उत्कृष्ट संघ – सावित्रीबाई फुले विद्यापीठ, पुणे
५. ललित कला विभाग उत्कृष्ट संघ – शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर