
no images were found
डॉ.सकट यांच्या सामाजिक कार्याचा शिवाजी विद्यापीठाला अभिमान – डॉ.दिगंबर शिर्के
कोल्हापूर (प्रतिनिधी) – प्रामाणिक आणि जबाबदारीने कामे करणारे विद्यापीठाचे उपकुलसचिव डॉ.उत्तम सकट यांच्या सामाजिक कार्याचा विद्यापीठाला अभिमान आहे, असे कौतुकोद्गार डॉ.दिगंबर शिर्के यांनी काढले. डॉ.सकट यांना महाराष्ट्र शासनाचा 2022-23 साठीचा साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल प्रशासनाच्यावतीने विद्यापीठाच्या व्यवस्थापन सभागृहामध्ये सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. कुलगुरू डा.शिर्के पुढे म्हणाले, डॉ.सकट विद्यापीठाच्या लोकविकास केंद, वाहन विभाग, लेखा विभागामध्ये उत्तम कामगिरी केलेली आहे. कार्यालयीन जबाबदारी यशस्वीपणे पार पाडत सामाजिक जाणीव ठेवून पीएच.डी.संशोधनासाठी केलेल्या प्रबंधाचे पुढे समाजासाठी उपयोग होणे आणि त्याची दखल शासन पातळीवर घेतली जाणे, हे निश्चित विद्यापीठासाठी भूषणाव आहे. त्यांचे सामाजिक कार्य सर्वांसाठी आदर्शवत असे आहे.
याप्रसंगी, विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ.प्रमोद पाटील, अधिष्ठाता डॉ.श्रीकृष्ण महाजन, उपकुलसचिव डॉ.एस.एम.कुबल यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी, कुलसचिव डॉ.विलास शिंदे, वित्त व लेखाधिकारी डॉ.सुहासिनी पाटील, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ.अजितसिंह जाधव, आजीवन अध्यासन केंद्राचे संचालक डॉ. रामचंद्र पवार, राष्टीय सेवा योजनाचे संचालक डॉ.तानाजी चौगुले, कायदा अधिकारी अनुष्का कदम, उपकुलसचिव डॉ.वैभव ढेरे यांचेसह अनेक मान्यवर उपस्थित होते.