
no images were found
शिवाजी विद्यापीठातील भक्ती बाटे हिचे नेट-जीआरएफ परीक्षेत घवघवीत यश
कोल्हापूर (प्रतिनिधी) – शिवाजी विद्यापीठाच्या रसायनशास्त्र अधिविभागातील विद्यार्थीनी कु. भक्ती बाटे हिने जून 2023 मध्ये घेण्यात आलेल्या सीएसआयआर-नेट परीक्षेत ऑल इंडिया रँक 65 मिळविला आहे. कु. बाटे रसायनशास्त्र अधिविभागातून एम.एस्सी ऑरगॅनिक केमेस्ट्रिी या विषयातून पदव्युत्तर पदवी 2022 साली उत्तीर्ण झालेली आहे. कोल्हापूर शहरातील फुलेवाडी येथील मध्यमवर्गीय कुटुंबातील कु.बाटे हिने हे घवघवीत यश प्राप्त केले आहे. या नामवंत संस्थेतून सीएसआयआर-युजीसी-नेट-जीआरएफ उत्तीर्ण झाल्यानंतर भारतातील कुठल्याही शैक्षणिक संस्थेत संशोधन करण्यासाठी पाच वर्षांसाठी फेलोशिप दिली जाते. बंग्लोर येथील इन्स्टीटयूट ऑफ सायन्स् ही अतिशय नामांकित संशोधन संस्था असून त्या ठिकाणी पीएच.डी.चे संशोधन करण्याचा तिचा मानस आहे. या परीक्षेसाठी एकूण 44429 इतके विद्यार्थी बसले होते. त्यामध्ये कुमारी भक्ती बाटे हिचा एआयआर 65 इतका आहे.
या विषयासाठी रसायनशास्त्र विभागातील अधिविभागप्रमुख डॉ.के. डी. सोनवणे आणि सर्व शिक्षकाचे बहुमोल मार्गदर्शन मिळाले. या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहेे.