Home Uncategorized दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी प्रमाणपत्र शिबीर

दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी प्रमाणपत्र शिबीर

14 second read
0
0
21

no images were found

दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी प्रमाणपत्र शिबीर

 

कोल्हापूर : मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, कोल्हापूर व प्राथमिक शिक्षणाधिकारी यांच्या संकल्पनेतून RPWD Act 2016 नुसार दिव्यांग मुलांच्या प्रवर्गानुसार प्रमाणपत्र काढण्यासाठी 26 डिसेंबर 2023 पासून तालुका निहाय दिव्यांग मुलांचे प्रमाणपत्र काढण्याचे नियोजन छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय, (CPR ) तसेच सेवा रुग्णालय, कसबा बावडा, कोल्हापूर येथे सुरु आहे. विद्यार्थ्यांचे प्रमाणपत्र काढणे आवश्यक असल्याने योजनेचा लाभ प्रमाणपत्राशिवाय मिळू शकत नसल्याने याबाबत जिल्हा समन्वयक, समावेशित शिक्षण, जि.प, कोल्हापूर / विशेष शिक्षक/ विषयतज्ञ IE, समावेशित शिक्षण, गट शिक्षणाधिकारी कार्यालय, सर्व पंचायत समिती यांच्याशी संपर्क साधावा.  जास्तीत जास्त विद्यार्थी या योजनेत सहभागी होतील यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी सुषमा देसाई व शिक्षणाधिकारी (प्राथ.) मीना शेंडकर यांनी केले आहे.

 या तपासणी शिबीरासाठी येणारे विद्यार्थी व पालक यांच्या अल्पोपहार व प्रवास खर्चासाठी गट स्तरावर अनुदान देण्यात आले आहे. समावेशित शिक्षण उपक्रमांतर्गत वय वर्षे 0 ते 18 वयोगटातील दिव्यांग मुलांचे सर्वेक्षण गटस्तरावर कार्यरत असणारे विशेष शिक्षक व विषयतज्ञ IE यांच्यामार्फत केले जाते. सर्वेक्षण झाल्यानंतर RPWD Act 2016 नुसार दिव्यांग मुलांचे प्रवर्गानुसार वर्गीकरण केले जाते. समावेशित शिक्षण अंतर्गत दिव्यांग विद्यार्थी शाळेत समायोजन होण्याच्या दृष्टिने विविध सेवा सुविधा शासनामार्फत पुरविल्या जातात.  यामध्ये मदतनीस भत्ता, प्रवास भत्ता, वाचक भत्ता व मुलींना प्रोत्साहन भत्ता या सेवा पुरविण्यासाठी दिव्यांग विद्यार्थ्यांचे प्रमाणपत्र आवश्यक असल्याने या सेवा सुविधा पुरविण्यास अडचणी निर्माण होतात. यासाठी शाळा स्तरावर सर्वेक्षण झालेल्या दिव्यांग मुलांना प्रमाणपत्र काढण्यासाठी जिल्हास्तरावर तपासणी होणे गरजेचे आहे.

तपासणी शिबीरामध्ये गटनिहाय प्रमाणपत्रासाठी शिफारस झालेली संख्या खालील प्रमाणे : -आजरा -48, भुदरगड -58, चंदगड – 32, गडहिंग्लज -25, गगनबावडा -4, हातकणंगले -37, करवीर- 27, पन्हाळा -23, राधानगरी- 21 व शाहुवाडी -48 याप्रमाणे आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

महायुतीला भरभरून मतदान केलेल्या नागरिकांचे आभार, खासदार धनंजय महाडिक..

महायुतीला भरभरून मतदान केलेल्या नागरिकांचे आभार, खासदार धनंजय महाडिक..   कोल्हापूर (प…