no images were found
तात्पुरत्या स्वरुपात कंत्राटी पध्दतीने अशासकीय कर्मचारी पद भरती
कोल्हापूर : जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, कोल्हापूर यांच्या अखत्यारित असलेल्या सैनिकी मुलींचे वसतीगृह व महासैनिक दरबार हॉल व लॉनसाठी अशासकीय पदांची निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात कंत्राटी पध्दतीने भरती करण्यात येणार आहेत. यासाठीचे अर्ज दिनांक २६ मार्च २०२४ पर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, कोल्हापूर येथे जमा करावेत. प्राप्त अर्जाची छाननी करुन पात्र उमेदवारांची मुलाखत दिनांक २८ मार्च २०२४ रोजी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, कोल्हापूर येथे दुपारी १२ वाजता घेण्यात येणार आहे अशी माहिती जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले.कर्नल डॉ. भिमसेन चवदार (निवृत्त) यांनी केले आहे.
सैनिकी मुलींचे वसतीगृह, कोल्हापूर येथे पहारेकरी (पुरुष), पद-1, एकत्रित मानधन- रुपये 19 हजार 950, सैनिकी मुलींचे वसतीगृह, कोल्हापूर येथे माळी (पुरुष), पद-1, एकत्रित मानधन- रुपये 12 हजार 465 व महासैनिक दरबार हॉल व लॉन, कोल्हापूर येथे पहारेकरी (पुरुष), पद-1, एकत्रित मानधन- रुपये 13 हजार 300 याप्रमाणे आहेत.
ही पदे तात्पुरत्या स्वरुपात कंत्राटी पध्दतीने व एकत्रित मानधनावर असून माजी सैनिक व माजी सैनिक विधवा पत्नी, त्यांचे पाल्य यांना अनुक्रमे प्राधान्य देण्यात येणार आहे. इच्छुकांनी आपले अर्ज व सोबत आधार कार्ड, कामाचा अनुभव व कोर्स केल्याची कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. अर्जामध्ये मोबाईल नंबर नमुद करणे आवश्यक आहे.
उमेदवार निवडीचे सर्व अधिकार जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, कोल्हापूर यांना राहतील. इतर अटी, शर्ती व सविस्तर माहितीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, कोल्हापूर येथे संपर्क साधावा, असे आवाहनही ले. कर्नल डॉ. भिमसेन चवदार (निवृत्त) यांनी केले आहे.