
no images were found
‘वंशज’ मालिकेत युक्तीद्वारे दादाबाबूंचा शोध घेण्यातून गोंधळ माजला आणि घटनाक्रमाला अनपेक्षित वळण मिळाले
सोनी सबवरील ‘वंशज’ मालिकेतवडीलोपार्जित संपत्ती आणि सत्ता मिळवण्यासाठी महाजन कुटुंबात सुरू असलेला संघर्ष दाखवला आहे. युविकाच्या अचानक झालेल्या मृत्यूपाठोपाठ एक दुसरे वळण पुढे येते, ज्यात युविका युक्ती मुलतानी (अंजली तत्रारी)च्या रूपात महाजन कुटुंबात प्रवेश करते. डीजे (माहिर पांधी) करत असलेल्या कारस्थानांना आळा घालून कुटुंबाचे रक्षण करणे हा तिच्या येण्यामागचा हेतू आहे. अलीकडच्या भागांमध्ये युक्ती दारू पिऊन झिंगलेल्या डीजेला त्याच्या खोलीत घेऊन जाते आणि दादाबाबूंच्या (पुनीत इस्सार) अचानक बेपत्ता होण्यामागचे रहस्य त्याच्याकडून काढून घेण्याचा प्रयत्न करते.
दुसऱ्या दिवशी सकाळी, डीजे सकाळी उठतो तेव्हा त्याला आदल्या रात्रीच्या गोष्टी अंधुक आठवत असतात. महाजन मॅन्शनच्या तळघरात त्याने दादाबाबूंना डांबून ठेवले असते, ते तिथेच आहेत ना, याची तो खात्री करतो. दुसरीकडे, काहीही करून आपल्या कुटुंबाला डीजेच्या कुटिल करस्थानांपासून वाचविण्याचा युक्तीने निर्धार केला आहे. डीजे कोणत्या थराला जाऊ शकतो याची कल्पना तिला आली आहे. दादाबाबूंवरून डीजेचे लक्ष हटावे, यासाठी ती खोट्या आवाजाचा वापर करून एक बनावट धाड घालण्याचे योजते. यामुळे महाजनांच्या घरात नुसता गोंधळ माजतो. नाट्य उलगडत जाते आणि अनपेक्षित संकट पुढे उभे ठाकते. यातून युक्ती आणि डीजे यांच्यात पाठलागाचे नाट्य सुरू होते. या सगळ्या गोंधळात एक धक्कादायक अकस्मात होतो आणि त्यात युक्ती बेशुद्ध होते. ती जेव्हा शुद्धीवर येते, तेव्हा तिला दिसते की, दादाबाबू महाजन मॅन्शनमध्ये सगळ्या कुटुंबियांसह मजेत आहेत. हे दृश्य पाहून तिच्या मनात अनेक प्रश्नांचे मोहोळ उठते.
दादाबाबू परत येण्यामागचे सत्य आणि डीजेच्या कुटिल हेतूंविषयी युक्तीला समजेल का?
युक्तीची व्यक्तिरेखा साकारत असलेली अभिनेत्री अंजली तत्रारी म्हणाली,“युक्तीचे लक्ष्य डीजेच्या करस्थानांना आळा घालून त्याने तिच्या कुटुंबाशी जो खेळ केला त्याचा जाब त्याला विचारण्याचे आहे. आपले वडील मुलतानी यांच्या मदतीने हे सगळे कसे करता येईल, याचा ती विचार करत आहे. पण या संवेदनशील परिस्थितीत युक्तीच्या मनात दृढ निर्धार आणि भीती यांचा संघर्ष सुरू आहे. आपल्या कुटुंबाला वाचविण्याची प्रेरणा तिच्या दृढतेमागे आहे. पण सामोऱ्या येणाऱ्या आडवळणांमुळे तिच्या मनात धास्ती देखील आहे. आगामी भागांमध्ये प्रेक्षक बघतील की, या अनेपेक्षित वळणाचा सामना युक्ती कशाप्रकारे करते आणि डीजे पासून आपल्या कुटुंबाला वाचवण्याचे आपले प्रयत्न कसे चालू ठेवते.”