
no images were found
डेनिमचा कालातीत फॅशन अपील!
कलाकार नेहमी डेनिम फॅशनच्या कालातीत मोहकतेकडे आकर्षित झाले आहेत. आकर्षक शैली व विविधतेमुळे जगभरातील वॉर्डरोब्समध्ये डेनिम नक्की पाहायला मिळतात. डेनिममधून आरामदायी व लक्षवेधक जीवनशैलीची खात्री मिळते. एण्ड टीव्ही कलाकार राहुल जेठवा (अवध बिहारी वाजपेयी, ‘अटल‘), गझल सूद (काटे, ‘हप्पू की उलटन पलटन‘) आणि विदिशा श्रीवास्तव (अनिता भाबी, ‘भाबीजी घर पर है‘) यांनी त्यांची स्टाइल व्यक्त करण्यासाठी पसंतीची निवड म्हणून डेनिमचा अवलंब केला आहे. एण्ड टीव्हीवरील मालिका ‘अटल‘मधील राहुल जेठवा ऊर्फ अवध बिहारी वाजपेयी म्हणाले, ”डेनिम माझ्या दैनंदिन जीवनातील पसंतीची निवड आहे, कारण यामधून स्टाइल व आरामदायीपणा मिळतो. जीन्सचा रग्ड लुक असो, डेनिम जॅकेटची क्लासिक आकर्षकता असो किंवा ब्लॅक डेनिमचा स्लीक लूक असो डेनिम स्टाइल व्यक्त करण्यासाठी अविरत पर्याय देते. विविध रंग व शेड्समधील डेनिमची विविधता विविध प्रसंगांशी जुळून जाते, ज्यामुळे माझ्या वॉर्डरोबमध्ये विविध डेनिम पाहायला मिळतील.”
एण्ड टीव्हीवरील मालिका ‘हप्पू की उलटन पलटन‘मधील गझल सूद ऊर्फ उत्साही काटे सेटवरील तिचा विश्वसनीय सोबती म्हणून डेनिमचे कौतुक करते. ती म्हणाली, ”डेनिम मला खूप आवडते, कारण त्यामध्ये आरामदायीपणा व स्टाइलचे परिपूर्ण मिश्रण आहे. डेनिममधून मोहकता दिसून येण्यासोबत वाहून नेण्यास देखील सोपी आहे, ज्यामुळे माझ्या वॉर्डरोबमध्ये भरपूर डेनिम आहेत. काटेचा उत्साही स्वभाव दाखवायचा असो किंवा अधिक आकर्षक लुक प्राप्त करायचा असो, डेनिममधून तो मिळतो. डेनिमची कालातीत अपील व अनुकूलता सर्वोत्तम आहे, ज्यामुळे मी सहजपणे कोणत्याही सीनसाठी तयार होऊ शकते. मला सांगावेसे वाटते की मी माझ्या जुन्या डेनिम फेकून देत नाही, तर डेनिम टिकाऊ असल्यामुळे त्यांचे रिसायकल करून हँडबॅग्ज व पाऊच बनवते आणि ते खूप आकर्षक दिसतात.” एण्ड टीव्हीवरील मालिका ‘भाबीजी घर पर है‘मधील विदिशा श्रीवास्तव ऊर्फ अनिता भाबी यांनी डेनिमच्या कालातीत मोहकतेची प्रशंसा केली. त्या म्हणाल्या, ”डेनिमची मोठी खासियत म्हणजे डेनिम कोणत्याही वैयक्तिक स्टाइलशी जुळून जाते. जीन्सच्या आरामदायी फिटिंगपासून डेनिम ड्रेसच्या आकर्षकतेपर्यंत डेनिम कोणत्याही प्रसंगासाठी विविध पर्याय देते. डेनिमचा टिकाऊपणा आणि लो मेन्टेनन्स डेनिमला दररोज परिधान करण्यासाठी व्यावहारिक व विश्वसनीय पर्याय बनवतात. तसेच डेनिम दिवसा व रात्री आकर्षक दिसते, ज्यामुळे मी विविध इव्हेण्ट्ससाठी मग ते मित्रांसोबत फेरफटका मारायचा असो किंवा डिनरला जायचे असो डेनिमला प्राधान्य देते.”