no images were found
सीएएच्या समर्थनार्थ आफ्रिकन अभिनेत्री मेरी कडून मोदींचे कौतुक!
प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या सरकारनं आजपासून देशभरामध्ये नागरिकता सुधारणा कायदा (सीएए) लागू केला आहे. त्यावर आता जगभरातील विविध देशांमधून प्रतिक्रिया येताना दिसत आहे. अशातच आफ्रिकन अमेरिकन गायिका मेरी मेलिबननं तिच्या पोस्टमधून मोदींचे आभार मानले आहेत.
मेरीनं तिच्या पोस्टमधून या कायद्याला आपला पाठींबा दर्शवत मोदीजींनी देशाला एका शांततेच्या दिशेनं नेण्याचा प्रयत्न केला आहे. ही खऱ्या लोकशाहाची ओळख आहे. अशा शब्दांत आफ्रिकन अमेरिकन अभिनेत्री अन् गायिका मेरीनं तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
एक्सवर मेरीनं शेयर केलेली पोस्ट आता नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्या पोस्टमध्ये तिनं ख्रिश्चन आणि त्यांचे धार्मिक स्वातंत्र्य यावर भाष्य करत सध्या पाकिस्तान, बांग्लादेश आणि अफगाणिस्तानमध्ये ज्या बिगर मुस्लिम लोकांना त्रासाला सामोरं जावं लागत आहे त्यांना आता अभय मिळणार आहे. त्यांना त्यांची वेगळी ओळख मिळणार आहे.एक ख्रिश्चन महिला म्हणून धार्मिक स्वातंत्र्याला जागतिक स्तरावरील वेगळी ओळख म्हणून ज्या सीएए कायद्याची घोषणा करण्यात आली त्यासाठी मोदींचे मी आभारी आहे. अशा शब्दांत मिलबेननं तिची भावना व्यक्त केली आहे.
मेरीनं तिच्या पोस्टमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांचे कौतुक केले आहे. त्यांनी सीएए कायद्याविषयी जो निर्णय घेतला आहे त्याचे समर्थन केले आहे. कुशल नेतृत्व आणि धार्मिक स्वतंत्रता टिकविण्यासाठी त्यांनी घेतलेला निर्णय योग्य आहे. मोदीजी आणि शाहजी आपण जो देशातील नागरिकांसाठी घेतलेल्या त्या कायद्याची निर्मिती ही वेगवेगळ्या अर्थानं महत्वपूर्ण ठरणार आहे. त्यासाठी तुम्हाला मनपूर्वक धन्यवाद. अशा शब्दांत मेरी मिलबेननं आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
मेरी मिलबेनच्या त्या पोस्टवरुन नेटकऱ्यांनी देखील त्यावरुन तिला प्रतिक्रिया दिल्या आहेत. मेरीचं म्हणणं हे भारतातील नागरिकांचे स्वातंत्र्य आणि गरजवंतांसाठी ज्या कायद्याची निर्मिती करण्यात आली आहे त्यांना ती लाभदायी ठरणार आहे. अशा प्रकारचे आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या वतीनं लोकसभा निवडणूक कार्यक्रमाच्या अगोदरच सीएए कायदा लागू करण्याबाबत घोषणा करण्यात आली आहे.