
no images were found
महाशिवरात्रीच्या निमित्ताने पांडवलेणी येथे हिंदु जनजागृती समितीकडून विशेष पूजा !
कोल्हापूर – देशात श्रीराम मंदिर आक्रमकांकडून मुक्त झाले, त्याचप्रमाणे देशातील अन्य मंदिरेही आक्रमकांच्या कह्यातून मुक्त करण्यासाठी आपण जागृत असले पाहिजे. देशात ‘लँड जिहाद’, ‘लव्ह जिहाद’, धर्मांतर यांसह अन्य विविध समस्या हिंदूंसमोर आवासून उभ्या आहेत. महाशिरात्रीच्या निमित्ताने भगवान शंकराला शरण जाऊन हिंदु धर्मावरील या संकटांच्या विरोधात आपण सतत कृतीशील होण्याचा निर्धार व्यक्त करूया, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे कोल्हापूर जिल्हा समन्वयक श्री. किरण दुसे यांनी केले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने निमित्ताने पांडवलेणी येथे विशेष पूजा करण्यात आली त्या प्रसंगी ते बोलत होते.
या प्रसंगी अभिषेक, शिवाची आरती, प्रसाद वाटप, तसेच हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी कटीबद्ध होण्यासाठी प्रतिज्ञा घेण्यात आली. शिवरात्रीचे औचित्य साधून उपस्थित भाविकांनी काही काळ शिवाचा नामजप केला. या कार्यक्रमासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे श्री. सुनील खैरे, श्री. अमर मिसाळ, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. प्रणव पाटील आणि श्री. निलेश पाटील, धर्मप्रेमी सर्वश्री यशराज पाटील, अथर्व पाटील, अभिजित पाटील, व्यावसायिक श्री. नंदकुमार सुतार, जोतिबा देवस्थान येथील पुजारी श्री. आेंकार बनकर, हिंदु जनजागृती समितीचे कोल्हापूर जिल्हा समन्वयक श्री. किरण दुसे, श्री. अनिकेत कदम, श्री. मच्छिंद्र एकशिंगे यांसह पोहाळे, निगवे, भुये, भुयेवाडी या गावांमधील भाविक, तसेच जोतिबा देवस्थानला जाणारे भक्तगण उपस्थित होते.