Home शैक्षणिक न्यू कॉलेज ऑफ फार्मसी येथे पारितोषिक  वितरण समारंभ उत्साहात.  

न्यू कॉलेज ऑफ फार्मसी येथे पारितोषिक  वितरण समारंभ उत्साहात.  

56 second read
0
0
71

no images were found

न्यू कॉलेज ऑफ फार्मसी येथे पारितोषिक  वितरण समारंभ उत्साहात.                                                                         कोल्हापूर (प्रतिनिधी): न्यू कॉलेज ऑफ फार्मसी येथे पारितोषिक  वितरण समारंभ दिनांक १३ ऑगस्ट रोजी मोठ्या उत्साहात व जल्लोषात पार पडला. या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून श्री.प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाउसचे अध्यक्ष मा. श्री. बी.जी.बोराडे यांनी उपस्थिती लावली होती.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व सरस्वती पूजनाने झाली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सचिन पिशवीकर यांनी स्वागतपर भाषणात वर्षभरातील प्रगतीवर प्रकाश टाकला. त्यांनी विद्यार्थ्यांच्या यशस्वी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

       या समारंभात संस्थेच्या संचालिका सौ. स्वाती अनिल निगडे मडम यांनी त्यांचा मातोश्री श्रीमती  संजीवनी विलासराव खाडे यांच्या स्मरणार्थ शैक्षणिक गुणवत्ता प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र, स्मृतीचिन्ह  व रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.

          त्यामध्ये प्रथम वर्षामध्ये प्रथम क्रंमांक कु. वैष्णवी विजय घोसाळकर , द्वितीय क्रमांक कु वृषाली गंभीर मगदूम, तृतीय क्रमांक कु.स्वरांजली दत्तात्रय भोसले.  

द्वितीय वर्षातील प्रथम क्रमांक कु. सायली शिवाजी पाटील, द्वितीय क्रमांक कु. पूजा संजय धुमाळ व ओंकार दिगंबर जंगम तृतीय क्रमांक कु. प्रविणकुमार देसाई यांनी पटकाविले.

        प्रमुख पाहुण्यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांना सतत प्रयत्नशील राहण्याचा संदेश दिला. “यश म्हणजे केवळ पुरस्कार नव्हे, तर सतत शिकण्याची वृत्ती आणि मेहनत हाच खरा पुरस्कार आहे,” असे ते म्हणाले.

         या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष श्री. बी.जी. बोराडे., चेअरमन डॉ. के.जी.पाटील व्हाइस चेअरमन श्री.डी.जी.किल्लेदार तसेच संचालिका  सौ.स्वाती अनिल निगडे ,संचालक  श्री. वाय. एल.खाडे, श्री. पी.सी.पाटील, विकास अधिकारी डॉ.संजय दाभोळे प्राचार्य डॉ.सचिन पिशवीकर यांचे मार्गदर्शन लाभले .

       या कार्यक्रमासाठी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापिका रोहिणी ताटे यांनी केले. कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन प्राध्यापिका अंकिता शिंदे यांनी केले.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शैक्षणिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

जागतिक महिला दिनानिमित्त भाजप आणि भागीरथी महिला संस्थेच्यावतीने शिवाजी पेठेतील वेताळमाळ तालीमजवळ मोफत प्रशिक्षण शिबिर संपन्न, ज्येष्ठ महिलांचा सत्कार

जागतिक महिला दिनानिमित्त भाजप आणि भागीरथी महिला संस्थेच्यावतीने शिवाजी पेठेतील वेताळमाळ ता…