
no images were found
कुंडली भाग्य’मधील #PalVeer चे 300 एपिसोड्स साजरे केले!
झी टीव्हीवरील लोकप्रिय प्राईमटाईम मालिका ‘कुंडली भाग्य’ने सुरूवातीपासूनच आपल्या प्रेक्षकांना खुर्चीला खिळवून ठेवले आहे. बालाजी टेलिफिल्म्स निर्मित ह्या मालिकेत लोकप्रिय कलाकार – श्रद्धा आर्या (प्रीता), शक्ती आनंद (करण), मनित जौरा (रिषभ), पारस कलनावट (राजवीर), सना सय्यद (पाल्की), बसीर अली (शौर्य), शालिनी महल (शनाया) यांचा त्यात समावेश आहे. ह्या कौटुंबिक नाट्याने गेल्या 7 वर्षांपासून प्रेक्षकांचे लक्ष वेधले आहे आणि ह्या रोमांचक कथानकाचे 1790 एपिसोड्स प्रेक्षकांसाठी प्रस्तुत केले आहेत, तर ह्या मालिकेतील लाडकी जोडी पाल्की आणि राजवीर #PalVeer यांनी आपल्या समर्पित निष्ठावान प्रेक्षकांना प्रेम आणि समर्थन दर्शवत महत्त्वपूर्ण असे 300 भाग पूर्ण केले आहेत.
गेल्या वर्षी ह्या शो ने 20 वर्षांची झेप घेतली आणि नवीन महत्त्वपूर्ण व्यक्तिरेखांसोबत ओळख करून दिली. पारस कलनावट आणि सना सय्यद हे ह्या नवीन भूमिका साकारत अगदी सहजपणे ह्या मालिकेत मिसळून गेले आणि त्यांनाही चाहत्यांकडून मोठे प्रेम मिळाले. त्यांच्या व्यक्तिरेखा राजवीर आणि पाल्की यांनी ह्या कथानकामध्ये ताज्या दमाचा दृष्टीकोन आणला आणि प्रेक्षकांच्या दृश्यानुभवामध्ये भर टाकली. ह्या कलाकारांना नुकतेच सेटवर त्यांच्या चाहत्यांकडून त्यांचे यश साजरे करण्यासाठी केक आणि फुलांचा गुच्छ प्राप्त झाला. त्याचसोबत त्यांच्या फोटोफ्रेम्सही होत्या, ज्यातून त्यांच्या परफॉर्मन्समधून त्यांना त्यांच्या चाहत्यांकडून मिळणारे प्रेम आणि कौतुक झळकत होते. सहकलाकार आणि त्यांच्या निष्ठावंत चाहत्यांमधील दृढ नाते, सर्वांचे हास्य आणि आभार ह्यावेळेस दिसून आले.
पारस कलनावट म्हणाला, “कुंडली भाग्य’चा हिस्सा बनताना मला खूप मजा येत आहे कारण हा सर्वोत्तम टेलिव्हिजन शोज्पैकी एक आहे आणि मला आनंद आहे की हा वारसा पुढे चालवण्याची संधी मला मिळाली. आमच्या चाहत्यांकडून एवढे काही आम्हांला मिळाले हा अनुभव खरोखरीच गहिवरून टाकणारा आहे. ह्या मालिकेचा प्रवास खरोखरीच एका जादुई स्वप्नासारखा राहिलेला असून #PalVeer चे 300 भाग पूर्ण करणे खरोखरीच खास आहे. मी खूपच आभारी आहे.”
सना सय्यद म्हणाली, “कुंडली भाग्यमधील माझा प्रवास अतिशय छान राहिला आहे. यात अनेक संस्मरणीय क्षण आणि आमच्या प्रेक्षकांसोबत हृदयाचे नाते आहे. ह्या मालिकेचा 7 वर्षांचा मस्त प्रवास आणि 1790 हून अधिक एपिसोड्समधून ह्या मालिकेची कायमस्वरूपी लोकप्रियता आणि प्रेक्षकांची निष्ठा दिसून येते. मात्र, #PalVeer चा 300 एपिसोड्सच्या प्रवासाचेही कलाकार आणि चाहत्यांच्या हृदयात खास स्थान आहे आणि त्यातूनच व्यक्तिरेखा आणि त्यांच्या प्रेक्षकांचे विशेष नाते दिसून येते. मला अतिशय आनंद आहे की चाहत्यांना आमची जोडी आवडते. मी वचन देते की पासर आणि मी आमच्या टीमसमवेत प्रेक्षकांचे मनोरंजन करणे सुरू राखेन आणि दर दिवशी त्यांचे मन जिंकण्यासाठी आमचे 100 टक्के देऊ.”
ह्या मालिकेची दिलखेचक कथा प्रेक्षकांसमोर उलगडत असताना राजवीर आपला मुलगा असल्याचे जेव्हा करण सांगतो त्याबद्दल प्रेक्षक उत्सुकतेने पुढे काय होईल यांची प्रतीक्षा करत आहेत. काय क्षमा आणि स्वीकारार्हता अस्तित्वात येईल की तणाव आणखी वाढेल?