Home सामाजिक फ्रान्समध्ये होणाऱ्या जागतिक कौशल्य स्पर्धेसाठी नाव नोंदणी 

फ्रान्समध्ये होणाऱ्या जागतिक कौशल्य स्पर्धेसाठी नाव नोंदणी 

53 second read
0
0
36

no images were found

फ्रान्समध्ये होणाऱ्या जागतिक कौशल्य स्पर्धेसाठी नाव नोंदणी 

 

कोल्हापूर : ल्योन, फ्रान्स येथे आयोजित केलेल्या जागतिक कौशल्य (सन 2024) स्पर्धेमध्ये सहभागी होण्यास इच्छुक असणाऱ्या पात्र उमेदवारांनी  https://kaushalya.mahaswayam.gov.in/ या लिंकवर भेट देवून आपली नाव नोंदणी करावी. याबाबत अधिक माहितीसाठी  जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सी बिल्डिंग, शासकीय निवासस्थान, विचारे माळ, कावळा नाका  कोल्हापूर  येथे प्रत्यक्ष अथवा ०२३१-२५४५६७७ या दूरध्वनीवर संपर्क साधावा, असे  आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त संजय माळी यांनी केले आहे.

जागतिक कौशल्य स्पर्धा दर दोन वर्षांनी होते आणि ही जगातील सर्वात मोठी व्यावसायिक शिक्षण व कौशल्य उत्कृष्टता स्पर्धा असून जगभरातील २३ वर्षाखालील तरुणांकरिता त्यांच्यातील कौशल्य सादर करता येते. ही स्पर्धा ऑलिम्पिक खेळासारखीच असते. सन २०२४ मध्ये ल्योन, फ्रान्स येथे आयोजित केलेल्या जागतिक कौशल्य स्पर्धेच्या पूर्व तयारीच्या दृष्टीने विविध ५२ क्षेत्रांशी संबंधित जिल्हा व राज्य स्तरावर व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, सेक्टर स्किल कौन्सिल, विविध औद्योगिक आस्थापना यांच्या सहकार्याने  कौशल्य स्पर्धा (Skill Competition) आयोजित करण्यात येणार आहे. त्यानुसार या स्पर्धेमधून जिल्हा, राज्य आणि देश पातळीवर निवड केलेल्या उमेदवारांची नावे पुढील जागतिक नामांकनासाठी पाठविण्यात येतील.

 पात्रता निकष : जागतिक कौशल्य स्पर्धा २०२४ करिता वयोमर्यादा हा एकमेव निकष ठरविण्यात आलेला आहे. स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी उमेदवाराचा जन्म 1 जानेवारी २००२ किंवा तद्नंतरचा असणे अनिवार्य आहे. तसेच ॲडीटिव्ह म्यॅन्युफॅक्चरिंग, क्लाऊड कॉम्पुट्यींग, सायबर सिक्युरिटी, डिजिटल कन्स्ट्रक्शन, इंडस्ट्रिअल डिझाईन टेक्नॉलॉजी, इंडस्ट्री 4.0, इन्फारमेशन नेटवर्क गॅबलिंग मेकॅट्रॉनिक्स, रोबोट सिस्टीम इंटिग्रेशन अँड वॉटर टेक्नॉलॉजी (Additive Manufacturing, Cloud Computing, Cyber Security, Digital Construction, Industrial Design Technology, Industry 4.0, Information Network Gabling, Mechatronics, Robot System  Integration & Water Technology) या क्षेत्राकरिता उमेदवाराचा जन्म 1 जानेवारी, १९९९ किंवा तद्नंतरचा असणे अनिवार्य आहे.

सन २०२४ मधील ल्योन, फ्रान्स येथे आयोजित जागतिक कौशल्य स्पर्धा जिल्हा, विभाग, राज्य व देश पातळीवरून प्रतिभासंपन्न, कुशल उमेदवारांचे मानांकन करण्याच्या दृष्टीने होत आहे. स्पर्धेकरिता या सर्व शासकीय व खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITIs), तंत्रनिकेतन महाविद्यालये (Polytechnics), अभियांत्रिकी महाविद्यालये (Engineering Colleges), (एमएसएमई टुल रुमस, सीआयपीईटी, आयआयटी, महाराष्ट्र स्टेट युनिर्व्हसिटी एमएसबीव्हीटी, प्रायव्हेट स्किल युनिर्व्हसिटी, फाईन आर्टस कॉलेज, फ्लॉवर ट्रेनिंग इस्न्टिट्युट ऑफ ज्वेलरी मेकिंग) MSME Tool Rooms, CIPET, IIT, Maharashtra State Skill University, MSBVET, Private Skill University, Fine Arts College, Flower Training Institute, Institute of Jewellary making प्रशिक्षण संस्था, तसेच महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी अधिनस्त सर्व व्यवसाय प्रशिक्षण संस्था यांना या  स्पर्धेत सहभागी होण्याकरिता आवाहन करण्यात आले आहे. स्पर्धेचे सविस्तर वेळापत्रक लवकरच जाहीर होणार असून निवड केलेल्या उमेदवारांना वेळोवेळी लागणारे मार्गदर्शन व सहकार्य कौशल्य विकास कार्यालयामार्फत प्रदान करण्यात येईल, असेही श्री. माळी यांनी पत्रकाव्दारे कळविले आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली!

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली! मुंबई : गेल्या महिन्याभर…