
no images were found
मोदी सरकार सहकार आंदोलनाचे जनआंदोलनात रूपांतर करण्याचा प्रयत्न करत आहे
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी नवी दिल्ली येथे, नागरी सहकारी बँकांची अम्ब्रेला संघटना, नॅशनल अर्बन कोऑपरेटिव्ह फायनान्स अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड (एनयूसीएफडीसी), चे उद्घाटन केले. यावेळी अमित शहा यांनी “Cooperation among Cooperatives” ही भावना बळकट करण्यावर भर दिला.
आपल्या भाषणात अमित शहा म्हणाले की, जोपर्यंत सहकारी संस्थांना परस्पर सहकार्याने पुढे जाण्याचे बळ दिले जात नाही तोपर्यंत आपण पुढे जाऊ शकत नाही. ते म्हणाले की, जवळपास 20 वर्षांच्या संघर्षानंतर आज नॅशनल अर्बन कोऑपरेटिव्ह फायनान्स अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनची स्थापना होत असून हा दिवस आपल्या सर्वांसाठी खूप शुभ दिवस आहे.
केंद्रीय सहकार मंत्री म्हणाले की, यापूर्वी सहकार मंत्रालय आणि सहकार क्षेत्र अनेक मंत्रालयांमध्ये विखुरले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतर स्वतंत्र सहकार मंत्रालय स्थापन करून सहकाराला नवसंजीवनी दिली आहे. सहकार मंत्रालयाच्या रुपाने सहकार आंदोलनाला एक अम्ब्रेला संघटना मिळाली आहे, असेही ते म्हणाले. 125 वर्षे सहकार क्षेत्राने संघर्ष केला आणि आपले अस्तित्व टिकवून ठेवले, परंतु आता सरकारी यंत्रणेच्या मदतीने ते वेगाने प्रगती करेल आणि देशाच्या अर्थव्यवस्थेत आपला मान मिळवेल. तसेच सहकार आंदोलनचे जनआंदोलनात रूपांतर करण्याचा प्रयत्न सुरू आहे. ते म्हणाले की, भारतासारख्या विशाल देशात विकासाचा मापदंड केवळ आकडे असू शकत नाही, तर देशाच्या विकासात लोकांचा सहभाग हा मोठा मापदंड असला पाहिजे
अमित शहा म्हणाले की, अम्ब्रेला संघटना ही काळाची गरज आहे आणि स्वयं-नियमनासाठी एक प्रकारची नवीन सुरुवात आहे. या संघटनेच्या स्थापनेनंतर देशातील नागरी सहकारी बँकांचा विकास अनेक पटींनी वाढणार असल्याचे त्यांनी सांगितले. आमच्या विश्वासार्हतेसाठी, आम्ही स्वतःला अपग्रेड करणे आणि भारतीय रिझर्व्ह बँकेच्या सर्व नियमांचे पालन करणे खूप महत्वाचे आहे. आपण असे केले नाही तर भविष्यात आपण स्पर्धेत टिकून राहू शकणार नाही, असे ते म्हणाले. अम्ब्रेला संघटनेचे मुख्य काम म्हणजे अगदी लहान बँकांनाही बीआर कायद्यासाठी तयार करणे. ते म्हणाले की, प्रत्येक शहरात नागरी सहकारी बँका सुरू करण्याच्या उद्देशाने आपण पुढे जायला हवे.
केंद्रीय गृह व सहकार मंत्री म्हणाले की, सहकारी वित्त क्षेत्रात चांगले काम करणाऱ्या पतसंस्थांचे बँकांमध्ये रूपांतर करण्याची व्यवस्था या अम्ब्रेला संघटनेने करावी. ते म्हणाले की, एनयूसीएफडीसी चे एक उद्दिष्ट म्हणजे पतसंस्था आणि नागरी सहकारी बँकांच्या सेवा आणि संख्या वाढवणे हे देखील असले पाहिजे. प्रत्येक शहरात नागरी सहकारी बँक कशी असावी याचा कालबद्ध कार्यक्रम आखला पाहिजे. तसेच सहकार आंदोलन जिवंत ठेवायची असेल तर ती समर्पक बनवावी लागेल आणि ती वाढवावी लागेल. छोटय़ा बँकांना अम्ब्रेला संघटनेकडून अनेक प्रकारच्या सुविधा मिळतील, बँका आणि नियामक यांच्यात सुरळीत संवाद साधण्याचे कामही ही अम्ब्रेला संघटना करेल, असे ते म्हणाले. या संघटनेला आपल्या सीमा व्यापक आणि सर्वत्र सुलभ करण्यासाठी काम करायचे आहे. सहकाराचा विस्तार करायचा असेल तर नागरी सहकारी बँक मजबूत करण्याची जबाबदारी अम्ब्रेला संघटनेची आहे, असे ते म्हणाले.
अमित शहा म्हणाले की, नागरी सहकारी बँकांना देशभरात व्यवसाय करण्यासाठी क्लिअरिंगची सिस्टम स्थापित करणे आवश्यक आहे. आमच्याकडे 1500 बँकांच्या 11000 शाखा आणि 5 लाख कोटी रुपयांच्या ठेवी आणि 3.50 लाख कोटी रुपयांचे कर्ज अशी सामूहिक ताकद आहे. ते म्हणाले की ही एक मोठी ताकद आहे आणि ती वाढवण्याचे आमचे ध्येय नाही तर संपूर्ण नागरी सहकारी बँकिंग व्यवस्था मजबूत करण्यासाठी संस्थेने एकत्रितपणे त्याचा वापर केला पाहिजे. अमित शाह म्हणाले की देशातील नागरी सहकारी बँकांनी त्यांचा निव्वळ एनपीए दर 2.10% पर्यंत कमी केला आहे आणि त्यात आणखी सुधारणा करण्याची गरज आहे. अम्ब्रेला संघटनेने येत्या तीन वर्षात आपला पाया रचण्यासाठी कठोर परिश्रम करावेत, असे ते म्हणाले.