no images were found
नमो महारोजगार मेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित रहावे – अमोल येडगे
कोल्हापूर : कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत नोकरी इच्छुक उमेदवारांकरिता दि. २ व ३ मार्च २०२४ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील विद्या प्रतिष्ठानचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, विद्यानगरी, बारामती येथे नमो महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा नमो महारोजगार मेळावा पुणे विभागातील कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर व पुणे जिल्ह्यातील युवक-युवतींसाठी असल्याने जिल्ह्यातील जास्तीत जास्त उमेदवारांनी मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे.
मेळाव्यात सहभागी होवू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी अधिक माहितीसाठी www.mahaswayam.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी अथवा जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, कोल्हापूर या कार्यालयास ०२३१-२५४५६७७ या दूरध्वनीवर संपर्क साधावा. या मेळाव्यासाठी पुणे विभागातील ३२० पेक्षा अधिक नामांकित कंपन्यांनी सहभाग नोंदविला असून २७ हजारपेक्षा जास्त रिक्तपदे अधिसूचित केली आहेत. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील ११ आस्थापनांनी २ हजार २१ रिक्तपदे कळवली आहेत. यात फिटर, वेल्डर, सी.एन.सी. ऑपरेटर, व्ही.एम.सी. ऑपरेटर, डॉक्टर, नर्स, ट्रेनी इंजिनियर, सुपरवायझर, इलेक्ट्रीशियन, ग्राफिक डिझायनर, टर्नर, मिलिंग ऑपरेटर, वेब डेव्हलपर, एच.आर.एक्झिक्युटिव्ह, रिसेप्शनिस्ट, मशिनिस्ट, प्रोग्रामर, मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह, जॉब इन्स्पेक्टर, प्लान ऑपरेटर, हेल्पर, टेक्निशियन, हाउस कीपिंग, टेलेकॉलर, फिल्ड ऑफिसर, टेलर, शीट मेटल, Auto cad Faculty, Ms, Office, Tally GST Faculty, ऑफीसबॉय, सोफ्टवेअर डेव्हलपर, मेट्रोलॉजी इंजिनियर इ. रिक्तपदे खाजगी आस्थापना/ कंपन्यांनी कळविली आहेत. दहावी, बारावी, पदवी, पदविका, पदव्युत्तर पदवी प्राप्त उमेदवारांच्या मेळाव्याच्या ठिकाणीच मुलाखती घेऊन निवड करण्यात आलेल्या उमेदवारास निवडपत्र देण्यात येणार आहे.