no images were found
भाजपाच्या वतीने आस्था रेल्वे उत्साहात अयोध्येला रवाना
कोल्हापूर ( प्रतिनीधी ) :५०० वर्षाच्या प्रतीक्षेनंतर अयोध्या याठिकाणी प्रभू श्री रामांचे भव्य मंदिर साकारले गेले. त्यामुळे संपूर्ण देशातील राम भक्तांना अयोध्या याठिकाणी प्रत्यक्ष जाऊन प्रभू श्री रामांचे दर्शन घेण्याची आस लागली आहे. भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्ह्यातील राम भक्तांना अयोध्या याठिकाणी प्रभू श्री रामांचे दर्शन होण्यासाठी विशेष आस्था रेल्वे आयोजित केली आहे. खासदार धनंजय महाडिक यांच्या विशेष पुढाकाराने हि रेल्वे थेट कोल्हापूर येथून अयोध्या ठिकाणी धावणार आहे. पक्षाच्या माध्यमातून ५ हजार भाविकांना अयोध्या येथे रेल्वे प्रवासाने नेण्याचे उद्धिष्ट असून आज भक्तिमय वातावरणात जय श्रीराम यांच्या घोषणा देत आस्था रेल्वे आयोध्येकडे रवाना झाली.
आजच्या या अयोध्या प्रवासासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील जवळपास १३४४ रामभक्त सामील झाले आहेत. भगव्या टोप्या, भगवे ध्वज, प्रभू श्री रामचंद्रांचा जयघोष करीत हे रामभक्त सकाळी ८ वाजलेपासून रेल्वे स्थानकावर एकत्र आले. जय श्री रामांच्या घोषणांनी आज कोल्हापूर रेल्वे स्थानक दणाणून गेले. राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री नाम.चंद्रकांतदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच खासदार धनंजय महाडिक यांच्या पुढाकारातून आजच्या या आस्था रेल्वे मधील सर्व राम भक्तांच्या भोजन, निवासाची व्यवस्था भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून होणार असून यासाठी पक्षाच्या माध्यमातून रेल्वे प्रमुख, बोगी प्रमुख अशा व्यवस्था करणात आल्या आहेत.
आज सकाळी १०.३० वाजता कोल्हापूर रेल्वे स्थानक येथे भारतीय जनता पार्टीचे राजे समरजीतसिंह घाटगे, माजी आमदार अमल महाडिक, भाजपा जिल्हाध्यक्ष सर्वश्री विजय जाधव, राहुल देसाई तसेच सत्यजित नाना कदम, राहूल चिकोडे यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी आयोध्याकडे रवाना होणाऱ्या रामभक्तांची भेट घेतली. त्यांची अस्थेनं चौकशी केली. या सर्वांना सूचना देखील केल्या. जय श्री राम नामाचा जयघोष करत आस्था रेल्वेला ध्वज दाखवून आयोधेकडे रवाना केलं.
याप्रसंगी डॉ.राजवर्धन, सुनील मगदूम, रूपाराणी निकम, राजू मोरे, विशाल शिराळकर, संजय जासूद, शैलेश पाटील, अभिजित शिंदे, सतीश घरपणकर, सचिन बिरंजे, गिरीष साळोखे, धीरज पाटील, अमर साठे, सचिन तोडकर, सचिन पोवार, इंद्रजीतबापू जाधव, संग्राम निकम, अशोक रामचंदनी, रामसिंह मोर्या, नंदा जगदाळे, सरिता हरूगले, निलेश डांगरा, धनश्री तोडकर, सुनीलसिंह चव्हाण यांच्यासह भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येन उपस्थित होते.