no images were found
ब्लूम बाय जयकल्प फाउंडेशन आयोजित “विजय द सेलिब्रिट” – एका अनोख्या कार्यक्रमाची घोषणा!
कोल्हापूर, २६ फेब्रुवारी २०२४: ब्लूम बाय जयकल्प फाउंडेशन, कोल्हापूर यांच्या वतीने “विजय द सेलिब्रिट” नावाचा एक अनोखा कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे. या कार्यक्रमात प्रथमच कोल्हापुरात दिव्यांगांचा फॅशन शो आयोजित करण्यात येत आहे. हा कार्यक्रम स्वरागिनी रिहॅबिलिटेशन सेंटरसाठी निधी संकलनासाठी आयोजित करण्यात आला आहे.
ही माहिती ब्लुमच्या संस्थापिका श्रद्धा राठोड शाह यांनी दिली. शलाका शहा -जैन, सुजाता परदेशी -कोरडे, प्रार्थना शहा, किरण कलाणी, भूमिका सचदेव, मोनिका जसुजा या उपस्धित होत्या
*कार्यक्रमाची माहिती:*
**दिनांक:* शनिवार, २ मार्च २०२४
* **वेळ:** दुपारी ४ वाजता
* **स्थळ:** बालाजी गार्डन, नागाळापार्क, कोल्हापूर
* **प्रमुख उपस्थिती:** श्रीमंत छत्रपती शाहु महाराज
* **उद्घाटन:** खासदार ध्यैर्यशील माने, राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष राजेश क्षीरसागर, मधुरीमाराजे छत्रपती, युवा नेते कृष्णराज महाडीक
* **सहभागी संस्था:** उमेद फाऊंडेशन, संजय ढेंगे ब्लाइंड असोसिएशन, अवनी संस्था, स्नेहबंध वृद्धाश्रम आणि लोकमान्य विद्यालय प्रतिभानगर
कार्यक्रम:*बालक, बालिका आणि वृद्ध यांचा विविध गुण दर्शनाचा कार्यक्रम
विशेष आकर्षण:
दिव्यांगांचा फॅशन शो
सामाजिक संस्थांसाठी व्यासपीठ
मनोरंजनाचे विविध कार्यक्रम
ब्लूम फाउंडेशनबद्दल:
ब्लूम ही संस्था विविध वंचित घटकांच्या विकासासाठी काम करते. दिव्यांग, अंध, अत्याचारग्रस्त अनाथ यांना आधार देणाऱ्या संस्थांना मदत करण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करते. “विजय” हा कार्यक्रम अशा प्रकारचा सहावा कार्यक्रम आहे.
या अनोख्या कार्यक्रमात सहभागी होऊन दिव्यांग आणि वंचित घटकांसाठी मदत करण्याचे आवाहन ब्लूम बाय जयकल्प फाउंडेशन आपल्या सर्वांना करत आहोत.