Home सामाजिक एडलवाइज टोकियो लाईफ’च्या वतीने लिगसी प्लस लॉन्च, कल्पक कुटुंब प्रस्ताव

एडलवाइज टोकियो लाईफ’च्या वतीने लिगसी प्लस लॉन्च, कल्पक कुटुंब प्रस्ताव

0 second read
0
0
29

no images were found

एडलवाइज टोकियो लाईफ’च्या वतीने लिगसी प्लस लॉन्च, कल्पक कुटुंब प्रस्ताव

मुंबई: सर्वसमावेशक कौटुंबिक प्रस्तावासाठी ग्राहकांच्या गरजेनुसार, एडलवाइज टोकियो लाइफ इन्शुरन्स’च्या वतीने लिगसी प्लस हे नाविन्यपूर्ण सहभागी उत्पादन सुरू केले आहे, जे एकाच उत्पादनाद्वारे 2 पिढ्यांसाठी जीवन संरक्षण आणि 3 पिढ्यांपर्यंतचे उत्पन्न देते.
हे उत्पादन बालकांचे आर्थिक नियोजन, वारसानिहाय तजवीज आणि जीवन कवच कालावधी सुरू असताना उदभवणाऱ्या कोणत्याही उदयोन्मुख गरजांसह ग्राहकांच्या अनेक गरजा पूर्ण करण्याचा एक प्रभावी मार्ग उपलब्ध करून देते. लवचिकता आणि तरलता प्रदान करण्याच्या दृष्टीने, उत्पादनात अॅक्रूअल ऑफ सर्व्हायव्हल बेनिफिट (पर्यायी) वैशिष्ट्य आणि झटपट उत्पन्न समाविष्ट आहे.
या नवीन उत्पादनाविषयी बोलताना एडलवाइज टोकियो लाईफ इन्शुरन्स’चे एक्सिक्युटीव्ह डायरेक्टर, सुभ्रजित मुखोपाध्याय म्हणाले, “एखाद्या सामान्य व्यक्तीच्या अगदी 3-4 मूलभूत चिंता असतात. या चिंता म्हणजे मुलांचे भविष्य, निवृत्ती, वारसा, एखादप्रसंगी संभाव्य आकस्मिक गरज इत्यादी. ते त्यांच्या सर्व गरजांना साजेसे ठरतील, अशा सुलभ आणि लवचीक वित्तीय पर्यायांच्या शोधात असतात. लिगसी प्लस’सह आमचे उद्दिष्ट हे ग्राहकांना असे उपाय उपलब्ध करून देण्याचे आहे; ज्यामध्ये त्यांच्या विविध आकांक्षांसाठी प्रभावी तसेच संपूर्ण कौटुंबिक आर्थिक गरजांची काळजी एका उत्पादनामार्फत घेऊन मन:शांती देणारा पर्याय पाहिजे असतो.”
लिगसी प्लस त्याच्या अॅक्रूअल ऑफ सर्व्हायव्हल बेनिफिट या पर्यायी वैशिष्ट्याद्वारे संपूर्ण कौटुंबिक युनिटमध्ये पर्सनलाईजेशन’ला चालना देते, ज्यामध्ये पॉलिसीधारक एकतर स्वत:च्या गरजेनुसार उत्पन्न काढू किंवा जमा करू शकतो. हे उत्पादन पॉलिसीधारक किंवा कुटुंबाच्या आर्थिक गरजांनुसार जमा झालेल्या निधीची अंशतः रक्कम काढण्याची परवानगी देखील देते.
या उत्पादनात प्रारंभिक उत्पन्न पर्यायाच्या माध्यमातून तरलता (लिक्विडिटी) आहे, जी पॉलिसीच्या पहिल्या वर्षाच्या अखेरीस पॉलिसीधारकाला लवकर उत्पन्न मिळवून देते.या उत्पादनाच्या नावात असलेला लिगसी हा शब्द खऱ्या अर्थाने पाळला असून वयाच्या 100 पर्यंत उत्पन्न मिळवून देणारा आहे. हा प्लान पॉलिसी कालावधी समाप्त होईपर्यंत खात्रीशीर उत्पन्न देतो, शिवाय प्राथमिक किंवा द्वितीय विमाधारकाचे निधन झाल्यास उत्पन्नात खंड पडू देत नाही. या प्लानच्या पेआऊटमधून कुटुंबाच्या किमान 3 पिढ्यांना लाभाची हमी राहते.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

डी. वाय. पी. अभियांत्रिकीमध्ये गुरुवारपासून “टेक्नोत्सव २के२५” -राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी नावनोंदणी सुरु 

डी. वाय. पी. अभियांत्रिकीमध्ये गुरुवारपासून “टेक्नोत्सव २के२५” -राष्ट्रीय स्तर…