no images were found
मनोज जरांगेंना ‘ते’ वक्तव्य भोवणार? शंभूराज देसाई
आजपासून राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवशेन सुरू होत आहे. शेतकरी आत्महत्या, मराठा आरक्षण, राजकारणाचे गुन्हेगारीकरण यासह विविध मुद्द्यांवरून विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे, मराठा आरक्षणासाठी पुकारलेले आंदोलन अधिक तीव्र होताना दिसतंय. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आव्हान देऊन मनोज जरांगे पाटील मुंबईच्या दिशेने निघाले होते. परंतु, आता ते पुन्हा आंतरवाली सराटीच्या दिशेने निघाले आहेत. त्यांनी मुंबईत येण्याचा निर्णय मागे घेतला आहे.
राज्याच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी गृहविभागाला एवढंच सांगितलं आहे की अशा भडक वक्तव्यामुळे अशा पद्धतीचं कायदा सुव्यवस्थेला धोका पोहोचणार असेल, संवैधानिक पदावर बसलेल्या नेत्याचा अशा पद्धतीने अवमान होत असेल तर कायदा कायद्याचं काम करेल. पोलीस पोलिसांचं काम करतील. त्यांची वक्तव्ये तपासली जातील. चौकशी केली जाईल. कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जे जे करावं लागेल ते आम्ही निश्चितपणाने करू .