
no images were found
‘अमृतकाळ आणि भारतातील आदिवासींचे समावेशन’ राष्ट्रीय परिषदेचे आयोजन
कोल्हापूर (प्रतिनिधी): शिवाजी विद्यापीठाच्या सामाजिक वंचितता व समावेशक धोरण अभ्यास केंद्राच्यावतीने दिनांक २७ व २८ फेब्रुवारी रोजी ‘अमृतकाळ आणि भारतातील आदिवासींचे समावेशन’ या विषयावर राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेचे उद्घाटन दिनांक २७ रोजी प्रा. सोनझारिया मिंज यांच्या बीजभाषणाने होणार असून याप्रसंगी अध्यक्षस्थान कुलगुरू प्रा. डी. टी. शिर्के भूषविणार आहेत. या राष्ट्रीय परिषदेस देशभरातून संशोधक व अभ्यास उपस्थित राहणार असून ते आदिवासी समाज आणि सामाजिक वंचितता, वंचिततेचे शास्त्रीयदृष्ट्या मोजमाप, आदिवासींच्या समावेशनासाठी करण्यात आलेल्या संविधानात्मक तरतुदी आणि कायदे, शासकीय धोरणे व उपाययोजना, आदिवासींच्या सामाजिक समावेशनातील अडथळे आणि उपाय, वन्यजीवनमान आणि भारतातील आदिवासी समाज यांचे संबंध, शास्वत विकासाची उद्दिष्ट्ये व आदिवासी समाज इत्यादी विषयावर शोधनिबंध सादर करणार आहेत. तसेच या विषयातील तंज्ञ व अभ्यासक मांडणी करणार आहेत.
या राष्ट्रीय परिषदेचा समारोप प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील प्रमुख उपस्थितीत होणार आहे. या राष्ट्रीय परिषद विद्यापीठाच्या मानव्यशास्त्र सभागृहामध्ये आयोजन करण्यात आले आहे. तरी या राष्ट्रीय परिषदेस प्राध्यापक, संशोधक, सामाजिक कार्यकर्ते, विद्यार्थी इत्यादींनी उपस्थित रहावे असे आवाहन कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे
व अभ्यास केंद्राचे संचालक डॉ.श्रीकृष्ण महाजन यांनी केले आहे.