Home राजकीय शरद पवारांच्या हस्ते तुतारी चिन्हा अनावरण!

शरद पवारांच्या हस्ते तुतारी चिन्हा अनावरण!

0 second read
0
0
36

no images were found

शरद पवारांच्या हस्ते तुतारी चिन्हा अनावरण!

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला तुतारी वाजवणारा माणूस हे पक्षचिन्ह दिले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी हे चिन्ह वापरता येणार आहे. त्याआधी या चिन्हाच्या अनावरण सोहळ्यासाठी शरद पवार गटाकडून मोठं शक्तीप्रदर्शन करण्यात आलं. ऐतिहासिक असलेल्या या चिन्हाचं अनावरण किल्ले रायगडावर करण्यात आलं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन भूमित जाऊन शरद पवारांच्या हस्ते या चिन्हाचं अनावरण करण्यात आलं आहे. दरम्यान, यानंतर शरद पवारांनी जनतेशी संवाद साधताना तुतारी जनतेला प्रेरणा देईल, असा विश्वास निर्माण केला.
“सध्याचा संघर्ष हा वैचारिक आहे. या देशात अनेक राजे झाले, संस्थानिक झाले परंतु रयतेचा राजा एकच झाला. सध्या राज्यात अडचणी वाढतील अशी स्थिती आहे. शिवछत्रपतींचे राज्य सामान्यांची सेवा करणारे राज्य होते. आज महाराष्ट्राची स्थिती बदलायची असेल तर पुन्हा एकदा याठिकाणी जनतेचे राज्य येईल यासाठी प्रयत्न करावे लागतील”, असं शरद पवार म्हणाले.
“निवडणूक आयोगाने रणशिंग फुंकायला तुतारी दिली आहे. संघर्षातून प्रेरणा देणारी ही तुतारी आहे. तुमच्या संघर्षातून, त्यागातून यश मिळणार याची खात्री आहे. या ऐतिसाहिक भूमीत आपण आलोय. या ठिकाणाहून प्रेरणा घेऊन जनतेची सेवा करुया”, असंही आवाहन शरद पवारांनी केलं.तुतारी हे राज्याचे ऐतिहासिक वाद्य आहे. त्यामुळे पक्षाला ऐतिहासिक चिन्ह मिळाले असल्याचा दावा सातत्याने केला जातोय. यानिमित्ताने या पक्षाच्या चिन्हाचे अनावरण आज रायगड किल्ल्यावर करण्यात आले. वयोमानानुसार, शरद पवारांना रायगड किल्ला सर करणे अवघड होते. परंतु, रोपवे आणि पालखीमुळे त्यांना रायगड किल्ल्यावरचा प्रवास सुकर झाला. आधी ते रोप वेने रायगडावर पोहोचले. तर नंतर त्यांनी पालखीचा आधार घेतला. जवळपास ४० वर्षांनंतर ते किल्ले रायगडावर आज आले आहेत.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In राजकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

डी. वाय. पाटील स्कूल ऑफ इंजनिअरिंग अँड मॅनेजमेंट आणि कॉलेज ऑफ फार्मसीचे श्रमसंस्कार शिबीर उत्साहात

डी. वाय. पाटील स्कूल ऑफ इंजनिअरिंग अँड मॅनेजमेंट आणि कॉलेज ऑफ फार्मसीचे श्रमसंस्कार शिबीर …