no images were found
पोस्टातही मिळणार अॅमेझॉन,फ्लिपकार्टसारख्या ऑनलाइन सुविधा
मुंबई : आता इंडिया पोस्टच्या माध्यमातून अॅमेझॉन,फ्लिपकार्टसारख्या ऑनलाइन आता इंडिया पोस्टनंही आपलं ई-कॉमर्स पोर्टल सुरू केलं आहे. इंडिया पोस्टच्या या नव्या सुरुवातीमुळे अॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट सारख्या मोठ्या ई-कॉमर्स वेबसाइट्सनाही मोठा झटका बसू शकतो. कारण इंडिया पोस्टचं विश्वसनीय जाळं भारतभर अनेक वर्षांपासून पसरलेलं आहे. या नव्या सुरुवातीमुळं आता पोस्ट ऑफिसच्या ग्राहकांना छोट्या-छोट्या गोष्टींसाठी पोस्ट ऑफिसच्या फेऱ्या माराव्या लागणार नाहीत, कारण आता इंडिया पोस्ट आता अॅयमेझॉन आणि फ्लिपकार्टप्रमाणं होम डिलिव्हरी करणार आहे. जेणेकरून ग्राहकांना घरबसल्या इंडिया पोस्टच्या सेवांचा लाभ देता येईल.
इंडिया पोस्टच्या नव्या सुरुवातीमुळं आता वस्तूंची डिलिव्हरी थेट लोकांच्या दारापर्यंत करता येणार आहे. अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टसारख्या मोठ्या ई-कॉमर्स वेबसाइटवर प्रवेश नसतानाही इंडिया पोस्टच्या ई-कॉमर्सला प्रवेश असेल.
पोस्टच्या ई-कॉमर्स वेबसाइटद्वारे खरेदी केलेला माल पोस्टमनद्वारे भारताच्या कोणत्याही कानाकोपऱ्यातील, ग्रामीण भागातील कोणत्याही नागरिकापर्यंत पोहोचवला जाईल. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे भारतातील पोस्ट ऑफिसची पोहोच ग्रामीण भागापर्यंत आहे आणि त्यांची संख्या 1.55 लाखांपेक्षा जास्त आहे
सर्वप्रथम तुम्हाला इंडिया पोस्ट Ecom.Indiapost.Gov.In च्या अधिकृत ई-कॉमर्स वेबसाइटवर जावं लागेल. यानंतर तुम्हाला होम पेजवर माय अकाउंट ऑप्शनवर क्लिक करावं लागेल. – त्यानंतर तुम्हाला Existing User आणि New User असे दोन प्रकारचे पर्याय दिसतील? आता Register Now हा पर्याय निवडावा लागेल आणि नोंदणी पूर्ण करावी लागेल. तुमची नोंदणी करण्यासाठी तुम्हाला तुमचा पत्ता, पिन कोड, राज्य, मोबाईल नंबर, ईमेल आयडी द्यावा लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमची वैयक्तिक माहिती सेव्ह करावी लागेल, ज्यातून तुम्हाला नवीन यूजर आयडी पासवर्ड मिळेल.