no images were found
ईडीच्या एका कारवाईमुळे संजय राऊतांच्या समस्येत वाढ
मुंबई : पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी अटकेत असलेल्या संजय राऊत यांच्या जामिनाबाबत कोर्टाने इडीला उत्तर द्यायला सांगितलं होतं. इडीने कोर्टापुढे उत्तर सादर करत संजय राऊत यांच्या जामिनाला विरोध केला आहे. पत्राचाळ आर्थिक घोटाळ्यात संजय राऊत सहभागी असल्याचा पुरावा आहे. 1039 कोटी 79 लाखांच्या पत्राचाळ घोटाळ्याचा तपास हा अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर आहे, असं इडीने सांगितलं आहे. ‘ईडी’ने संजय राऊतांच्या जामिनाला विरोध दर्शवल्याने त्यांच्यासमोरील समस्यांत आणखी वाढच केली आहे.
संजय राऊत यांची पत्नी वर्षा राऊत यांच्या खात्यातील 1 कोटी 8 लाखांचं ट्रान्झाक्शन संशयास्पद असल्याची माहिती ईडीने कोर्टाला दिली आहे. या दोघांच्या व्यवहार तपासणीत अनेक संशयास्पद ट्रान्झाक्शन सापडले आहेत. संजय राऊत हे प्रभावशाली राजकीय व्यक्तीमत्व असल्यामुळे तपासाता आणि साक्षीदारांवर प्रभाव टाकू शकतात. या प्रकरणात एका महिला साक्षीदाराने संजय राऊ यांनी धमकी दिल्याचा आरोप केला आहे, त्यामुळे तपास पूर्ण होईपर्यंत त्यांना जामीन देण्यास इडीने विरोध केला आहे. ‘ईडी’ने संजय राऊतांच्या जामिनाला विरोध दर्शवल्याने त्यांच्यासमोरील समस्यांत आणखी वाढच केली आहे. त्यामुळे यापुढे राऊतांच्या अडचणीत वाढ होणार असल्याचेच चित्र आहे. पीएमएलए कोर्टांमध्ये हे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.