Home मनोरंजन ‘आता थांबायचं नाय!’ या मराठी सिनेमाचं टिझर  प्रदर्शित !

‘आता थांबायचं नाय!’ या मराठी सिनेमाचं टिझर  प्रदर्शित !

32 second read
0
0
24

no images were found

‘आता थांबायचं नाय!’ या मराठी सिनेमाचं टिझर  प्रदर्शित !

 

    मराठी सिनेमे नेहमीच त्याच्या विषयांसाठी आणि सादरीकरणासाठी वाखाणले जातात. त्यातच गेल्या काही वर्षात महिलाप्रधान सिनेमांकडे मनोरंजनसृष्टीचं आणि प्रेक्षकांचं लक्ष वेधलं गेलंय. या ८ मार्च रोजी,खास महिला दिनाच्या निमित्ताने झी स्टुडिओज्, चॉक अँड चीज फिल्म्स आणि फिल्म जॅझ घेऊन आले आहेत ‘आता थांबायचं नाय’ या दमदार सिनेमाचा दर्जेदार टीजर!  महिलांचं शिक्षण आणि सक्षमीकरण ह्या गोष्टींना प्रोत्साहन देत तसेच सामान्य माणसाच्या दैनंदिन कष्टाळू जीवनावर आधारित हा चित्रपट येत्या महाराष्ट्र दिनी म्हणजेच १ मे रोजी आपल्या जवळच्या चित्रपटगृहात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

      जबाबदारीच्या काटेरी कुंपणात अडकलेली, स्वतः पेक्षा जास्त कुटुंबाला महत्व देणारी, प्रत्येक क्षेत्रात स्वतःच अस्तित्व शोधणारी,अहिंसेचं प्रतीक असलेली प्रेरणादायी व्यक्ती म्हणजे ‘स्त्री’ !  टिझर पाहता ‘आता थांबायचं नाय!’ हा चित्रपट प्रेरणा आणि मनोरंजन याचं उत्तम मिश्रण आहे असं समजतं आणि महत्वाची बाब म्हणजे हा सिनेमा एका सत्यघटनेवर आधारित आहे. 

      शिवराज वायचळ दिग्दर्शित या चित्रपटात भरत जाधव, सिद्धार्थ जाधव, प्राजक्ता हनमघर, किरण खोजे, प्रवीण डाळिंबकर, ओम भुतकर, पर्ण पेठे, रुपा बोरगांवकर आणि आशुतोष गोवारीकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. तर उमेश कुमार बन्सल, बवेश जानवलेकर, निधी हिरानंदानी आणि धरम वालिया निर्माते आहेत. 

     इतकच नव्हे तर सर्वांची आवडती ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी ह्यांची खास झलक या टिझरमध्ये पहायला मिळते त्या सुद्धा एका विशेष भूमिकेत या सिनेमामध्ये दिसणार आहेत. एका कणखर आणि स्वतंत्र महिलेची भूमिका अभिनेत्री प्राजक्ता प्राजक्ता हनमघरने चोख पार पाडली आहे. एकंदरीतच महिलांमध्ये एकजुटीची आणि प्रोत्साहनाची भावना असल्याचा एक संदेश ह्या चित्रपटाच्या टिझर मधून मिळतो.  ‘आता थांबायचं नाय!’ हा सिनेमा भावनिक तर आहेच पण त्या सोबतच प्रेरणादायक आणि मनोबल वाढवणारा आहे. तसेच पहिल्यांदाच हे सर्व दिग्गज कलाकार एकत्र आल्याने या चित्रपटाची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये वाढली आहे. 

     या वेळी ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी ह्या म्हणाल्या “मला वाटतं की जितकं एक स्त्री दुसऱ्या स्त्रीला समजून घेऊ शकते तितकं अजून कोणीच घेऊ शकत नाही. आज ती प्रत्येक क्षेत्रात पुढे आहे, सर्वांना सोबत घेऊन प्रगती करत आहे. आपल्या टीझरमध्ये दाखवल्याप्रमाणे, आज खास महिलादिनी आपण निश्चय करूयात की आपण असंच एकमेकांना समजून घेत एकमेकांच्या प्रगतीचे आणि समृद्धीचे खुल्या मनाने साक्षीदार होऊया.”

     निर्माती निधी हिरानंदानी ह्यांनी आपलं मत व्यक्त करत सांगितलं  “मी सुद्धा एक खंबीर आणि सशक्त स्त्री आहे त्यामुळे मला प्राजक्ता हनमघरची भूमिका मनापासून आवडली. मला वाटतं की आपल्याला लोकांकडून आदर आणि प्रतिष्ठेची वागणूक अपेक्षित असेल तर आपण त्या शिकवणीची सुरुवात आपल्या मुलांपासूनच करणं गरजेचं आहे”

     अभिनेत्री प्राजक्ता म्हणते “आपल्याकडे स्वतःवर प्रेम करायला शिकवतच नाही, त्यामुळे स्वतःवर प्रेम करा, आर्थिक स्वातंत्र्याचा योग्य वापर करा. स्त्री पुरुष समान आहेत. त्यामुळे दोघांची प्रगती झाली तरच राष्ट्राची प्रगती होईल” 

अभिनेत्री पर्ण पेठे हिने सुद्धा आपलं मत व्यक्त करत सांगितलं “आजची स्त्री सक्षम आणि सबळ आहेच, तिला अपेक्षा आहे ती फक्त प्रोत्साहनाची. एका दिवसाच्या शुभेच्छांनी जग बदलणार नाही. तर प्रत्येक माणसाकडून प्रत्येक स्त्रीला रोज मिळणाऱ्या आदरपूर्वक वागणुकीने बदल नक्कीच घडू शकतो”

 झी स्टुडिओज् ने मराठी सिनेसृष्टीला आणि प्रेक्षकांना आजवर अनेक दर्जेदार चित्रपट दिले आहेत. आता पुन्हा एकदा , या महाराष्ट्रदिनी, १ मे २०२५ रोजी ‘आता थांबायचं नाय!’ हा दमदार चित्रपट आपल्या समोर मोठ्या पडदयावर सादर करायला सज्ज आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

पीअँडजी शिक्षाचा प्रभावी दोन दशकांचा उत्सव: पीअँडजी शिक्षाचा “ट्वेंटी टेल्स ऑफ ट्रायम्फ” प्रकाशीत

पीअँडजी शिक्षाचा प्रभावी दोन दशकांचा उत्सव: पीअँडजी शिक्षाचा “ट्वेंटी टेल्स ऑफ ट्रायम्फ” प…