
no images were found
टिप्परचालकांचे महापालिकेला निवेदन
कोल्हापूर( प्रतिनिधी):-कचरा उठाव करणाऱ्या टिप्पर चालक कंत्राटात घोटाळा झाल्याचे आरोप आम आदमी पार्टीने केले होते. चालकांना किमान वेतन न देता फक्त पंधरा हजार इतकाच पगार त्यांना दिला जातो. प्रत्येक चालकाच्या पगारातून गेल्या आठ महिन्यात साढेसहा हजार रुपये प्रति महिने कपात करून एक कोटी रुपये लाटले असल्याचा दावा आप ने केला होता.
आज टिप्पर चालकांनी महापालिकेत जमून याबाबत निवेदन दिले. आम्हाला किमान वेतन दिले जात नाही, पगार सात तारखेपर्यंत होत नाही, पगारासाठी विनंती करावी लागते, सहीसाठी हजेरी पुस्तक दिले जात नाही, डबल ड्युटी केल्यास त्याचा पगार दिला जात नाही असे निवेदन मुख्य आरोग्य निरीक्षक जयवंत पवार यांना देण्यात आले.
पगार लांबल्यामुळे चालकांना आर्थिक अडचणीला सामोरे जावे लागत असल्याचे चालकांनी अधिकाऱ्यांना सांगितले.
आम आदमी पार्टीमुळे आम्हाला न्याय मिळाला आहे. त्यांनी आमच्याकडून कधीही पैशाची मागणी केलेली नाही. आप वर केलेले आरोप चुकीचे असल्याचे टिप्परचालकांनी सांगितले.
कंत्राटदार आम्हाला किमान वेतन देत नाहीत. आज आम्ही निवेदन देण्यासाठी महापालिकेत आलो आहे. उद्या आम्हाला कामावरून काढून टाकलं तर आम्ही महापालिकेच्या समोर उपोषणाला बसू असा इशाराही टिप्पर चालकांनी दिला.
यावेळी संजय राऊत, अमर बावडेकर, अजित पाटील, प्रमोद भाले, दत्ता भातखांडे, कुमार साठे आदी टिप्पर चालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.