no images were found
स्कोडा ऑटो इंडिया ने स्लाव्हिया स्टाइल एडिशन केली लाँच
कोल्हापूर : दोन वर्षांमध्ये एक लाख विक्रीचा टप्पा गाठल्यानंतर स्कोडा ऑटो इंडियाने त्यांची सर्वाधिक विक्री होणारी, फाइव्ह-स्टार सुरक्षित, क्रॅश-टेस्टेट सेदानची स्लाव्हिया स्टाइल एडिशन लाँच केली आहे. स्लाव्हिया स्टाइल एडिशन (१.५ टीएसआय डीएसजी) ची एक्स -शो रूम किंमत रूपये १९,१३,४००/-
या उत्पादनाबाबत मत व्यक्त करत स्कोडा ऑटो इंडियाचे ब्रॅण्ड संचालक पीटर जनेबा म्हणाले, ”स्लाव्हिया स्टाइल एडिशन आम्ही आमच्या सूक्ष्मदर्शी ग्राहकांच्या अभिप्रायांना प्राधान्य देत असल्याचे आणि ग्राहकांना अत्यंत विशेष, उच्च मूल्याचे उत्पादन देत असल्याचे उदाहरण आहे. ही एडिशन आमच्या ग्राहकांसाठी अत्यंत मर्यादित आकडेवारीमध्ये येते, पण भारतभरातील आमच्या २०० हून अधिक विक्री टचपॉइण्ट्समध्ये उपलब्ध असेल.”
स्टाइल एडिशन स्लाव्हियाच्या टॉप-ऑफ-द-लाइन स्टाइल व्हेरिएण्टच्या दर्जानुसार आहे. या कारमध्ये ड्युअल डॅश कॅमेरा सारखी प्रमाणित वैशिष्ट्ये आहेत. या कारवर ब्लॅक-आऊट-बी-पिलर्सवरील ‘एडिशन’ बॅज, ब्लॅक मिरर कव्हर्स आणि ब्लॅक रूफ फॉइल आहे. आतील भागामध्ये ग्राहकांचे ‘स्लाव्हिया’ ब्रॅण्डेड स्कफ प्लेटसह अभिवादन केले जाते, तसेच स्टीअरिंगवर ‘एडिशन’ बॅज आहे. कारमधून बाहेर पडताना पडल लॅम्पसह ब्रॅण्ड लोगो प्रोजेक्शनचा अनुभव मिळेल.
स्कोडा ऑटो इंडिया स्लाव्हियाच्या स्टाइल एडिशनचे ५०० युनिट्स लाँच करणार आहे. सर्व ५०० युनिट्समध्ये ७-स्पीड डीएसजी ऑटोमॅटिक गिअरबॉक्ससह डिझाइन केलेले विशेष १.५ टीएसआय इंजिन असेल. या प्रत्येक ५०० कार्स कँडी व्हाइट किंवा ब्रिलियण्ट सिल्व्हर किंवा टोर्नेडो रेड रंगांमध्ये उपलब्ध असतील. हे रंग रूफवरील विशेष ब्लॅक एलीमेंट्स आणि या स्लाव्हियाच्या ओआरव्हीएमला कॉन्ट्रास्ट म्हणून विशेषरित्या निवडण्यात आले आहेत. या एडिशनमधील विशिष्टता आणि अतिरिक्त वैशिष्ट्यांची किंमत स्लाव्हिया सेदानच्या समानुपाती स्टाइल व्हेरिएण्टच्या तुलनेत ३०,००० रूपये इतकी किफायतशीर आहे.
स्लाव्हिया स्टाइल एडिशन स्लाव्हियाच्या सुरक्षितता वारसाला पुढे घेऊन जाते. या कारमध्ये प्रमाणित सहा एअरबॅग्ज आहे आणि कार ग्लोबल एनसीएपीच्या नवीन, शिस्तबद्ध टेस्ट प्रोटोकॉल्स अंतर्गत प्रौढ व्यक्ती व मुलांच्या सुरक्षिततेसाठी संपूर्ण ५-स्टार रेटिंगसह येते. या कारसह प्रौढ व्यक्ती व मुलांसाठी कंपनीचा पूर्णत: क्रॅश-टेस्टेड रेटेड कार्सचा ताफा अधिक दृढ झाला आहे.
कुशक एसयूव्हीप्रमाणे स्लाव्हिया सेदान एमक्यूबी-एओ-इन प्लॅटफॉर्मवर आधारित आहे, जे विशेषत: भारतीय बाजारपेठेसाठी विकसित करण्यात आले आहे. कमी मेन्टेनन्स खर्च, उच्च स्थानिकीकरण आणि सर्विस व स्पेअर्ससाठी जलद टर्नअराऊंड टाइम्सवर लक्ष केंद्रित करत भारत व झेकमधील टीम्सनी संयुक्तपणे हा प्लॅटफॉर्म विकसित केला, तसेच स्कोडा डीएनएची पारंपारिक वैशिष्ट्ये जसे ड्रायव्हिंग गतीशीलता व सुरक्षितता कायम ठेवण्यात आले. कारमध्ये जवळपास ९५ टक्के स्थानिक घटक आहेत. ही कार ४ वर्ष किंवा १००,००० किमीची प्रमाणित वॉरंटी आणि जवळपास ८ वर्ष किंवा १५०,००० किमीच्या पर्यायी वॉरंटीसह येते. याव्यतिरिक्त मालकीहक्क अनुभवामध्ये वाढ करण्यासाठी आणि ग्राहकांकरिता मेन्टेनन्स खर्च कमी करण्यासाठी अनेक मेन्टेनन्स व सर्विस पॅकेजेस् आहेत.