
no images were found
दूरशिक्षण केंद्राच्या वतीने केंद्रीय अर्थसंकल्प यावर विशेष ऑनलाईन व्याख्यान
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठातील दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्र अर्थशास्त्र विषयाअंतर्गत नुकत्याच संसदेत सादर करण्यात आलेल्या केंद्रीय अर्थसंकल्प यावर विशेष ऑनलाईन व्याख्यानाचे आयोजन केल्याची माहिती संचालक प्रा.डॉ.डी.के.मोरे यांनी दिली. मंगळवार दि. दि. 13 फेब्रुवारी 2024, दुपारी 12:30 वा. “अंतरिम अर्थसंकल्प – 2024 : एक दृष्टिक्षेप” या विषयावर विशेष ऑनलाईन व्याख्यान आयोजित केले आहे. या व्याख्यानासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून शिवाजी विद्यापीठाच्या मानव्य विद्याशाखा, अधिष्ठाता प्रा. (डॉ) एम. एस. देशमुख, ऑनलाईन पद्धतीने उपस्थित राहणार आहेत. तरी दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्रातील सर्व विद्यार्थ्यांनी या व्याख्यानास https://shivajiuniversity.webex.com/shivajiuniversity/j.php?MTID=m38ae718fc199fd08491cb0e1
57ba336f या लिंकला जावून सहभागी व्हावे. असे आवाहन संचालक प्रा.डॉ.डी.के.मोरे.यांनी केले आहे.