Home राजकीय येत्या निवडणुकीनंतर दुकानदारी बंद होणार असल्यानेच कॉंग्रेस नेते सैरभैर : श्री.राजेश क्षीरसागर

येत्या निवडणुकीनंतर दुकानदारी बंद होणार असल्यानेच कॉंग्रेस नेते सैरभैर : श्री.राजेश क्षीरसागर

0 second read
0
0
44

no images were found

येत्या निवडणुकीनंतर दुकानदारी बंद होणार असल्यानेच कॉंग्रेस नेते सैरभैर : श्री.राजेश क्षीरसागर

कोल्हापूर ( प्रतिनीधी ) : महाविकास आघाडीत शिवसेना लोकप्रतिनिधींची होणारी गळचेपी, शिवसेनाप्रमुखांच्या विचारांचे पावलोपावली होणारे खच्चीकरण सहन न झाल्याने मुख्यमंत्री ना.मा.श्री.एकनाथजी शिंदे यांनी शिवसेनेत उठाव केला. नाहीतर आज शिवसेनेची अवस्था कॉंग्रेस प्रणीत उबठा गटासारखी झाली असती. शिवसैनिक हा जाणारा नाही तर प्रसंगी चार पावले मागे घेवून झेपावणारा वाघ आहे, हे येत्या निवडणुकीत टीकाकारांना दिसून येईल. येत्या निवडणुकीत कॉंग्रेसची दुकानदारी बंद होणार असल्याने कॉंग्रेस नेते सैरभैर झाले असल्याचा खोचक टोला राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी लगावला.
राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांच्या विशेष प्रयत्नातून महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेतून को.म.न.पा.प्र.क्र.१४ व्हीनस कॉर्नर अंतर्गत तारा टाईल्स ते नृसिंह ग्रुप रस्ता खडीकरण व डांबरीकरण करण्याच्या कामास रु.२० लाख इतका निधी मंजूर करण्यात आला आहे. या विकास कामांचा शुभारंभ आज भागातील प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.
यावेळी बोलताना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी, राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर मुख्यमंत्री ना.मा.श्री.एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखालील सरकारचे लोकाभिमुख व लोककल्याणकारी कामकाज सुरु आहे. आजपर्यंतच्या इतिहासात इतक्या मोठ्या प्रमाणात कोट्यावधींचा निधी कोल्हापूर शहराला प्राप्त झाला आहे. सुरवातीच्या अडीच वर्षात ठप्प झालेली विकास कामे मुख्यमंत्री ना.मा.श्री.एकनाथ शिंदे यांनी निधी देवून पूर्णत्वास नेली. परंतु, कॉंग्रेसच्या माजी पालकमंत्र्यांना टीका करण्याव्यतिरिक्त काहीच काम राहिले नसून ते टीका-टिप्पणीचे ब्रँन्ड अम्बेसिटर बनले आहेत. पालकमंत्री म्हणून अडीच वर्षात कोल्हापूरच्या विकासाचे योगदान त्यांनी जनतेपुढे मांडावे मगच इतरांवर टीका करावी, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.
यावेळी शिवसेनेचे माजी गटनेते राहुल चव्हाण, माजी नगरसेवक मधुकर काकडे, सुजयसिंह संकपाळ, फैजू ट्रेनर, किरण चौगुले, अरविंद काळूगडे, एजाज ट्रेनर, अशोकराव जाधव, महेश निकम, सुभाष चंदवाणी, फिरोज जमादार, संजय परब, नितीन जाधव, राजू मणियार, सुरेश दिवाण, इम्रान मुल्ला, रझाक जमादार, तानाजी जाधव, सौ.उषा यादव, सौ.सविता माजनाळकर, सौ.कीर्ती गोरे, सौ.रेखा करग्यार आदी भागातील नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In राजकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

ऑलिम्पिकसाठी महाराष्ट्राच्या खेळाडूंनी सज्ज व्हावे : राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन

ऑलिम्पिकसाठी महाराष्ट्राच्या खेळाडूंनी सज्ज व्हावे : राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन   पुण…