
no images were found
हार्दिक जोशीची पुन्हा होणार धमाकेदार एण्ट्री
स्टार प्रवाहवरील ‘तुझेच मी गीत गात आहे’ मालिकेचं कथानक सध्या अतिशय उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचलं आहे. एकीकडे वैदेहीच्या मृत्यूला मोनिकाच जबाबदार असल्याचं सत्य सर्वांसमोर उघड होणार आहे. तर दुसरीकडे मोनिकासाठी सनी नावाच्या व्यक्तीने लिहिलेली प्रेमपत्र मल्हारच्या हाती लागणार आहेत. त्यामुळे मल्हार आणि मोनिकाच्या नात्यात तणाव निर्माण झाला आहे. मल्हार-मोनिकाचं नातं निर्णायक वळणावर असताना मालिकेत पुन्हा एकदा अभिनेता हार्दिक जोशीची म्हणजेच शुभंकरची एण्ट्री होणार आहे. मोनिकाला प्रेमपत्र लिहिणारा सनी म्हणजे स्वत: शुभंकर असल्याचा खुलासा तो करणार आहे. त्यामुळे शुभंकरच्या रुपात मोनिकाच्या आयुष्यात पुन्हा नवं वादळ आलं आहे. अडचणीच्या या परिस्थितीतून मोनिका कसा मार्ग काढणार? मल्हार मोनिकाला माफ करणार का? काय असेल मल्हार-मोनिकाच्या नात्याचं भविष्य हे मालिकेच्या पुढील भागांमधून उलगडेल. तेव्हा पाहायला विसरु नका तुझेच मी गीत गात आहे रात्री ९ वाजता फक्त स्टार प्रवाहवर.