
no images were found
शिवाजी विद्यापीठात महात्मा गांधीजींच्या पुण्यतिथीनिमित्त विशेष व्याख्यान
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठातील गांधी अभ्यास केंद्र, दूरशिक्षण व ऑनलाइन शिक्षण केंद्र, नेहरू अभ्यास केंद्र आणि राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा गांधीजींच्या पुण्यतिथी निमित्त "नई तालीम : भारतीय शिक्षणाचा प्रयोग" या विषयावर विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती गांधी
अभ्यास केंद्र समन्वयक प्रा. डॉ.प्रकाश पवार यांनी दिली. मंगळवार दि. 30 जानेवारी 2024 रोजी महात्मा गांधीजींच्या पुण्यतिथीनिमित्त विद्यापीठातील शाहू सभागृह येथे सकाळी 10:30 वा विशेष व्याख्यानाचे आयोजन केले असून प्रमुख वक्ते म्हणून गांधीवादी विचारवंत एस. के. एच. स्वामी तसेच ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ.अशोक चौसाळकर मार्गदर्शन करणार आहेत. तसेच अध्यक्षस्थानी कुलगुरू प्रा. डॉ. डी.टी.शिर्के उपस्थित राहणार आहेत. यावेळी प्रमुख उपस्थितीत प्र- कुलगुरू प्रा. डॉ. पी. एस. पाटील कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे, नेहरू अभ्यास केंद्र समन्वयक डॉ. प्रल्हाद माने, राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉ. पी.एम.चौगुले,दूरशिक्षण व ऑनलाइन शिक्षण केंद्र संचालक प्रा.डॉ. डी. के. मोरे उपस्थित राहणार आहेत. या व्याख्यानास विद्यार्थी, शिक्षक व गांधीवादी कार्यकर्ते यांनी उपस्थित राहावे. असे आवाहन गांधी अभ्यास केंद्र समन्वयक प्रा. डॉ. प्रकाश पवार यांनी केले.