no images were found
कोल्हापूरमध्ये ‘सद़्भावना रॅली’च्या नावाखाली कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचा डाव..!
कोल्हापूर येथे औरंगजेबाचे स्टेटस ठेवणार्याला काहीही न करता, त्याच्या परिणामस्वरूप हिंदूंनी दिलेल्या प्रत्युत्तराविषयी ‘सद़्भावना रॅली’ का काढली जात आहे ? हे नाटक फक्त हिंदूंवर अन्याय झाल्यानंतर हिंदू रस्त्यावर उतरल्यावरच कसे सुचते ?
काश्मीर, पश्चिम बंगाल, केरळ मध्ये असंख्य हिंदूंच्या राजरोसपणे हत्या झाल्या, तेव्हा ‘सद़्भावना रॅली’ हा प्रकार का कुणी काढला नाही ? तसेच महाराष्ट्र राज्यात लव्ह जिहाद, धर्मांतर, बलात्कार इत्यादी होतच आहेत. मुस्लिम धर्मांधांनी रामनवमी, हनुमान जयंतीच्या मिरवणुकींतील निष्पाप हिंदु भक्तांवर हल्ले केले. जळगाव, नगर, अकोला अशा कित्येक जिल्ह्यात धर्मांधांनी पोलिसांच्या गाड्या पेटवून दिल्या. तेव्हा हे पुरोगामी म्हणवणारे, सद़्भावना रॅली काढू इच्छिणारे कुठे होते? श्रद्धा वालकर हिचे पस्तीस तुकडे करण्यात आले. दिल्लीतील साक्षी नावाच्या मुलीला मुसलमानाने असंख्य वेळा भोसकले, ७-८ वेळा दगड डोक्यात घातला, तेव्हा ‘सद़्भावना’ आठवली नाही का ?
कोल्हापूर येथील ७ जूनचा हिंदूंचा उद्रेक हा उगाचच झालेला नव्हता. त्याला पार्श्वभूमी होती पुढील प्रकरणांची.
१. कसबा बावडा येथे १९ फेब्रुवारीला शिवजयंतीला पाळणा सजवणार्या हिंदु महिलांना मारहाण करण्यात आली.
२. हेर्ले येथे शिवजयंतीचे पोस्टर फाडण्यात आले.
३. बिहारमधील ७ ते १४ वर्षे वयाच्या ६९ मुलांना आजर्याच्या मदरशात शिक्षण देण्यात येणा होते. त्यांना हिंदुत्ववाद्यांनी पकडून दिले. असे किती ट्रक कोल्हापुरात आले असतील, हे देवालाच ठाऊक !
४. लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याच्या क्षेत्रात एका ‘इंडिका’ गाडीवर ‘शरीयानुसार अजून ६ लग्ने बाकी आहेत’, असे लिहिणारी, भारतीय लोकशाहीला आव्हान देणारी गाडी हिंदूंनी पकडून दिली. तिही किरकोळ दंड आकारून सोडून दिली.
५. ‘दि कोल्हापूर स्टोरी ऑफ लव जिहाद’ : एका मौलवीच्या मुलाने एकटी आई, दोन मुली एक वयस्कर आजी अशा परिवाराला हेरले. धमक्या दिल्या. राजकीय दबाव आणला आणि १६ वर्षांच्या हिंदु मुलीला फूस लावून तिचे धर्मांतर केले. त्या मुलीच्या आईची पोलिसांनी नोंद घेतली नव्हती. त्यासाठी हिंदु संघटनांना आक्रमक व्हावे लागले.
६. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकदिनी ‘औरंगजेब सगळ्याचं बाप’ असे स्टेटस ठेवले.
या सगळ्या घटना घडत असतांना तथाकथित पुरोगामी कुठे होते ? भविष्यातील भयावहता समजून एक दिवस हिंदू रस्त्यावर उतरल्यावर ही ‘रॅली’ कशासाठी ? जेव्हा हिंदूंवर अत्याचार होतात, तेव्हा पुरोगामी गप्प का असतात ? आजवर कोल्हापूरने खरा हिंदुत्ववाद जपला; म्हणूनच जिल्ह्यात शांतता होती, हे लक्षात घ्यावे लागेल. जर सद़्भावना रॅलीच्या निमित्ताने कुणी हिंदूंना दंगलखोर ठरवण्याचा प्रयत्न करत असेल, तर हिंदू ते खपवून घेणार नाहीत.
यापूर्वीही कोल्हापूरमध्ये शांतता बिघडवण्याचे काम कोण करत आहे, याची चौकशी व्हावी; म्हणून एसपी, शहर डीवाय एसपी, कोल्हापूरचे पालकमंत्री यांना हिंदुत्ववादी संघटनांनी निवेदने दिली होती. त्यांची कोणती नोंद घेतली गेली ? काय कारवाई झाली ? आज कोल्हापूरसह महाराष्ट्रात औरंगजेबाचे स्टेटस पैसे देऊन ठेवायला सांगितले आणि कायदा-सुव्यवस्था कुणी बिघडवली, याचा शोध पोलिसांनी घ्यायला हवा. या स्टेटसच्या मागील मुख्य सूत्रधार कोण ? याविषयी एसआयटी मार्फत चौकशी व्हावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तसेच कोल्हापूरच्या एसपींना सकल हिंदू समाज कोल्हापूरच्या वतीने करण्यात येणार आहे. सद़्भावना रॅलीच्या नावाखाली कोल्हापूरमध्ये कायदा-सुव्यवस्था बिघडवण्याचे काम पुरोगामी मंडळी करत आहेत. हे राजकीय षड्यंत्र आहे का ? तसे असेल, तर हिंदूंना पुन्हा रस्त्यावर उतरावे लागेल. हे टाळण्यासाठी या सद़्भावना रॅलीला परवानगी देऊ नये. किंबहुना ही रॅली झाली नाही, तरच आता कोल्हापुरात असलेली शांतता तशीच राहील, अशी आमची सकल हिंदु समाजाची मागणी आहे.