मोदी आणि बिग बी यांच्यात झालेल्या चर्चेचा अखेर खुलासा
बॉलीवूड मेगास्टार अमिताभ बच्चन हे सोमवारी सकाळी ऐतिहासिक अयोध्या राम मंदिर सोहळ्यासाठी सहभागी झाले होते.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत राम लल्लाच्या मूर्तीचे अनावरण झाल्यानंतर ते मंदिरातून बाहेर पडताना दिसले. पाहुण्यांची भेट घेतली आणि त्यावेळी त्यांनी बिग बींशी संवादही साधला.
ज्यामध्ये पीएम मोदी बिग बींना हात जोडून अभिवादन करताना दिसत आहेत. दोघांनी एकमेकांना बघून स्मितहास्य केलं. पुढे पंतप्रधान बिग बींच्या प्रकृतीची विचारपूस करताना दिसले.
काही दिवसांपूर्वी बिग बींनी आपल्या हातावर शस्त्रक्रिया झाल्याची माहिती दिली होती. तीच आठवण करून देताना, पीएम मोदी बिग बींना आता तुमचा हात ठीक आहे का? असे विचारताना दिसले.ज्यावर अमिताभ यांनी हसत आणि होकारार्थी उत्तर देताना दिसले. व्हिडिओमध्ये अभिषेक बच्चन आणि अनिल अंबानी देखील पंतप्रधान मोदींना हात जोडून अभिवादन करताना दिसतात.
अयोध्येतील ‘प्राण प्रतिष्ठा’ सोहळ्यात कंगना रणौतने ‘जय श्री राम’चा जयघोष केला. राम लल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी बिग बी आणि अभिषेक यांच्याशिवाय इतर अनेक सेलिब्रिटींना आमंत्रित करण्यात आले होते. अयोध्येतील संपूर्ण राम मंदिर फुलांनी आणि दिव्यांनी सजले होते. सर्व सेलिब्रिटी सोमवारी पहाटे मंदिरात पोहोचले.