no images were found
अशोक राबाडे यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश
कोल्हापूर ( प्रतिनीधी ) : शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण या मूलमंत्रानुसार शिवसेनेचे काम सुरु आहे. शिवसेनाप्रमुखांचे विचार, समाज कार्याचा वसा पुढे घेवून जाणारे शिवसेना मुख्यनेते आणि राज्याचे मुख्यमंत्री ना.मा.श्री.एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पक्षात दिवसेंदिवस सामील होण्यास सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर रससावत आहेत. शिवसेनेचा इतिहास, त्याग समजावून घेवून शिवसेनाप्रमुखांनी दिलेला मूलमंत्र जपावा. गोरगरीब नागरिक, शेतकरी, व्यापारी, कष्टकरी, व्यावसायिक, कामगार अशा सर्वच घटकातील नागरिकांना न्याय देण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री ना.मा.श्री.एकनाथ शिंदे करत असून, शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून आरोग्य विषयक, शैक्षणिक, स्वयंरोजगाराचे उपक्रम हाती घेवून समाजहिताच्या कामांना प्राधान्य द्यावे, असे आवाहन राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी केले. कोल्हापूर शहरातील नामांकित श्री उत्तरेश्वर प्रासादिक वाघाची तालीमीचे अध्यक्ष श्री.अशोक रामचंद्र राबाडे यांनी त्यांच्या शेकडो युवा कार्यकर्त्यांसह आज शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते भगवा झेंडा आणि भगवा स्कार्फ स्वीकारून शेकडो युवकांनी शिवसेनेचा भगवा खांद्यावर घेतला. यावेळी “जय भवानी, जय शिवाजी”, “शिवसेना जिंदाबाद”, “शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे, मुख्यमंत्री ना.मा.श्री.एकनाथ शिंदे यांचा विजय असो” अशा घोषणा देण्यात आल्या. यावेळी श्री उत्तरेश्वर प्रासादिक वाघाची तालीमीचे अध्यक्ष श्री.अशोक रामचंद्र राबाडे यांची शिवसेना उपशहरप्रमुख पदावर नियुक्ती करण्यात आली. नियुक्तीचे पत्र राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर आणि जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. यावेळी याभागातून शिवसेना विभागप्रमुख पदावर शुभम माळवी आणि युवासेनेच्या उपशहरप्रमुख पदावर जयराज ओतारी यांची नियुक्तीही करण्यात आली आहे.
यावेळी उपस्थित युवकांना मार्गदर्शन करताना श्री.राजेश क्षीरसागर यांनी, शिवसेना स्थापनेमागे मोठा इतिहास आहे. राज्यासाठी शिवसेनेचे योगदान बहुमुल्य आहे. आताच्या घडीला शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारानुसार मुख्यमंत्री ना.मा.श्री.एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाने शिवसेनेची घोडदौड सुरु आहे. कोल्हापूर शहराच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या नामांकित तालमीच्या अध्यक्षांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे. शिवसेनेची विचारधारा अंगिकारणाऱ्या या सर्वांचेच शिवसेनेत स्वागत करताना पक्षवाढीसाठी आवश्यक उपक्रम, वैद्यकीय योजना भागातील नागरिकांपर्यंत पोहचविण्याचे काम सुरु करावे, असे आवाहन केले.
यावेळी शिवसेना शहरप्रमुख रणजीत जाधव, उपजिल्हाप्रमुख किशोर घाटगे, उपशहरप्रमुख सनी अतिग्रे, अशोक कदम, विनायक लोहार, सतीश जाधव, इंद्रजीत सुतार, अरुण मेस्त्री, उदय घाडगे, योगेश भोसले, युवराज तोडकर, राकेश पवार, अजित मेवेकरी, गणेश सुतार, अरुण लोहार, अजित निंबाळकर, गणेश राठोड, गणेश काटकर, सौरभ चव्हाण, युवासेनेचे शिवतेज सावंत, रोहन शिंदे आदी उपस्थित होते.