no images were found
महापालिकेच्यावतीने शहरामध्ये विविध ठिकाणी स्वच्छता मोहीम
कोल्हापूर : प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी शहरातील विविध ठिकाणी प्रभाग क्षेत्र अधिका-यांमार्फत स्वच्छता मोहीम राबविण्यात निर्देश दिले आहेत. यामध्ये शहरातील मुख्य रस्ते, चौक, डिव्हाईटर यांची स्वच्छता करण्यात आली. सदरची स्वच्छता मोहिम हि महादेव मंदीर, जुना जनावरांचा दवाखाना रोड, मंगळवार पेठ, पंचगंगा घाट परिसर, पिकनिक पाँईट रोड, टेंबलाईवाडी मंदिर परिसर, उंचगाव नाका मेनरोड, शिये नाका ते शुगरमिल रोड या परिसरात राबवण्यात आली. हि स्वच्छता मोहिम शनिवारी सकाळी 7 ते 9 या वेळेत राबविण्यात आली. या स्वच्छता मोहिमेत 3 टण माती, कचरा व प्लॅस्टिक जमा करण्यात आला.
सकाळी 10 वाजता प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी जुना जनावरांचा दवाखाना रोड, मंगळवार पेठ परिसरात या मोहिमेचा शुभारंभ केला. तसेच या परिसरात त्यांनी पाम ट्री वृक्षाचे वृक्षारोपन केले. यावेळी अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, सहा.आयुक्त डॉ.विजय पाटील, उपशहर अभियंता एन.एस.पाटील, मुख्य आरोग्य निरिक्षक जयवंत पवार, स्थानिक संस्थाकर अधिक्षक विश्वास कांबळे, मुख्य अग्निशमन अधिकारी मनीष रणभिसे, महिला व बालकल्याण अधिक्षक प्रिती घाटोळे उपस्थित होते. यानंतर प्रशासकांनी या परिसरात स्वच्छता करुन, शिये नाका ते शुगरमिल रोड येथे स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला. यावेळी प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी उघडयावर कचरा टाकणाऱ्यां संबंधीतांवर दंडात्मक कारवाई करुन संबंधीतांवर गुन्हां नोंद करण्याचे आदेश सर्व आरोग्य निरिक्षक यांना दिल्या. या स्वच्छता मोहिमेत नियंत्रण अधिकारी म्हणून उप-आयुक्त साधना पाटील, शिल्पा दरेकर, सहा.आयुक्त संजय सरनाईक, डॉ.विजय पाटील यांनी संबंधीत विभागातील कर्मचाऱ्यांसमवेत या स्वच्छता मोहिमेत सहभाग नोदविला. या स्वच्छता मोहिमेत 4 जेसीबी, 4 डंपर, 10 टिप्पर चा वापर करण्यात आला. तसेच पवडी, उद्यान, जन्म मृत्यू, ब्युरो, अग्निशमन, जनसंपर्क, सामान्य प्रशासन, रेकॉर्ड, आस्थापना, परवाना, विद्युत, मुख्य लेखापाल विभाग, नगररचना, अतिक्रमण, पाणी पुरवठा, नगरसचिव विभागातील 350 अधिकारी कर्मचाऱ्यांनी या स्वच्छता मोहिमेत सहभाग नोदविला. यावेळी आस्थापना अधीक्षक राम काटकर, सर्व विभागीय आरोग्य निरिक्षक, आरोग्य निरीक्षक, कर्मचारी व नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.