
no images were found
स्कोडा ऑटो इंडियाकडून दोन वर्षांमध्ये १ लाखांहून अधिक कारच्या विक्रीची नोंद
कोल्हापूर : स्कोडा ऑटो इंडियाने आपली विक्री गती कायम राखली आहे आणि गेल्या दोन वर्षांमध्ये १,००,००० हून कारची विक्री करण्याचा महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. यामधून कंपनीचे प्रबळ भारत–केंद्रित उत्पादन धोरण दिसून येते, ज्याअंतर्गत भारतातील बाजारपेठेसाठी डिझाइन करण्यात आलेली दोन जागतिक दर्जाची कुशक व स्लाव्हिया लाँच करण्यात आल्या. ही आकडेवारी संपादित करण्यामध्ये या दोन्ही मॉडेल्सचे मोलाचे योगदान राहिले आहे, जेथे कंपनीला यापूर्वी ही आकडेवारी संपादित करण्यामध्ये सहा वर्षांपेक्षा अधिक काळ लागला होता.
वर्ष २०२२ स्कोडा ऑटो इंडियासाठी विक्रमी ठरले, जेथे कुशक व स्लाव्हिया अशा दोन मॉडेल्स लाँच करण्यात आल्या. २०२३ मध्ये पुरवठ्यासंदर्भातील अडथळे व संबंधित समस्यांमुळे गतीवर काहीसा परिणाम झाला. स्थिती पुन्हा सुरळीत करण्याच्या दिशेने काम करत स्कोडाने १ जानेवारी त ३१ डिसेंबर २०२३ या कालावधीमध्ये ४८,७५५ युनिट्सच्या विक्रीचा टप्पा गाठला.
या विक्री कामगिरीबाबत मत व्यक्त करत स्कोडा ऑटो इंडियाचे ब्रॅण्ड संचालक पीटर जनेबा म्हणाले, ”वर्ष २०२२ विक्रमी ठरल्यानंतर वर्ष २०२३ दरम्यान गती कायम ठेवणे आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे होते. २०२३ मध्ये आम्ही आमच्या उत्पादन श्रेणीमध्ये सतत सुधारणा करत आमचे स्थान दृढ करण्यावर, तसेच आमचे नेटवर्क विस्तारित करण्यावर आणि अधिक समाधानी ग्राहकांसाठी विक्री व विक्री–पश्चात्त सेवांमध्ये दर्जा सुधारण्यावर लक्ष केंद्रित केले. ग्राहकांच्या सर्व गरजांची पूर्तता करण्यासाठी आमच्या ह्युमन टच तत्त्वाच्या माध्यमातून त्यांच्याशी कनेक्ट झालो. वर्षाच्या पहिल्या सहामाहीत पुरवठासंदर्भात आव्हाने असताना देखील आम्ही २०२३ च्या शेवटच्या तिमाहीची सांगता सकारात्मक करण्याची खात्री घेतली आहे. २०२४ साठी आम्ही विद्यमान श्रेणीमधील उत्साहवर्धक उत्पादन सादरीकरण, नवीन उत्पादन घोषणा करणार आहोत, तसेच निर्यातीच्या माध्यमातून आणि आमच्या नेटवर्कचा विस्तार करत अधिक विकास करणार आहोत. आम्ही ग्राहकांना आनंदित करण्यावर अधिक लक्ष केंद्रित करू आणि स्कोडा कुटुंबामध्ये नवीन ग्राहकांचे उत्साहपूर्ण स्वागत करू.”
स्कोडा ऑटो इंडियाने वर्षामध्ये ४८,७५५ कारच्या विक्रीची नोंद केली. विक्रमी वर्ष २०२२ नंतर या विक्रीची नोंद झाली, जेथे कंपनीने ५३,७२१ कारच्या विक्रीची नोंद केली होती. २०२१ च्या तिसऱ्या तिमाहीमध्ये आणि २०२२ च्या पहिल्या तिमाहीमध्ये कुशक व स्लाव्हिया लाँच केल्यानंतर हे यश संपादित करण्यात आले. वर्ष २०२३ मध्ये कंपनीने उत्पादनांना प्रबळ केले, जेथे कोडियकने २०२२ च्या तुलनेत १०० टक्के वाढीची नोंद केली आणि आतापर्यंतच्या सर्वोच्च वार्षिक विक्रीचा विक्रम रचला. भारत स्कोडा ऑटोसाठी प्रमुख बाजारपेठ आहे आणि युरोपबाहेर सर्वात मोठी बाजारपेठ आहे.