no images were found
दीपक केसरकरांना पोस्टाने पाठवली कडधान्याची पाकिटं
मुंबईः शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या विरोधात भाजप आक्रमक झाल्याचं बघायला मिळत आहे. त्याचं कारण शालेय शिक्षण विभागाने मध्यान भोजनात विद्यार्थ्यांना अंडी वितरित करण्याचा घेतलेला निर्णय. भाजप जैन सेलचा या निर्णयाला तीव्र विरोध दिसून येत आहे.शिक्षण विभागाच्या निर्णयाला विरोध म्हणून भाजप जैन सेलकडून शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना कडधान्याची पाकिटं पाठवली जात आहेत. कोल्हापूरच्या रेल्वे स्टेशन पोस्ट ऑफिसमधून मंत्री केसरकर यांना ही कडधान्याची पाकिटं पाठवली आहेत.
मध्यान भोजनात विद्यार्थ्यांना अंड वितरित करण्याचा निर्णय तात्काळ रद्द करावा, अशी मागणी भाजप जैन सेलचे प्रदेशाध्यक्ष संदीप भंडारी यांनी केली आहे. हा निर्णय मागे न घेतल्यास राज्यभरातून दीपक केसरकर यांना मोठ्या संख्येनं कडधान्याची पाकीट पाठवण्यात येणार असल्याचाही इशारा संदीप भंडारी यांनी दिला आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भरड धान्यावर विशेष भर देण्याच्या निर्णयाला मंत्री दीपक केसरकर मान्य करत नाहीत का? असाही प्रश्न भाजप जैन सेल प्रदेशाध्यक्ष संदीप भंडारी यांनी केला आहे. सरकारमधील एका मंत्र्याच्या विरोधात भाजपचेच लोक आंदोल करत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.