Home राजकीय रोहित पवारांच्या बारामती अॅग्रोवर ईडीची छापेमारी !

रोहित पवारांच्या बारामती अॅग्रोवर ईडीची छापेमारी !

0 second read
0
0
26

no images were found

रोहित पवारांच्या बारामती अॅग्रोवर ईडीची छापेमारी !

पुणे : बारमती अॅग्रो कथित गैरव्यावहार प्रकरणी मुंबईसह सहा ठिकाणी ईडीने (ED) छापेमारी केली आहे. आमदार रोहित पवार यांच्या बारमती अॅग्रो कंपनी केंद्रीय तपास यंत्रणांनी आज छापेमारी केली. सकाळपासून बारामती अॅग्रोच्या सहा कार्यालयावर ईडीकडून तपास करण्यात येतोय. गेल्या वर्षी रोहित पवार यांना याबाबत नोटीस आली होती. आता त्यांच्या कंपनीवर छापेमारी करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ईडीने छापेमारी केल्यानंतर कंपनीत इतर कुणालाही प्रवेश देण्यात येत नाही.
आमदार रोहित पवार यांनी याबाबत सूचक वक्तव्य केलेय. त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलेय की, “हा आहे स्वाभिमानी महाराष्ट्राच्या पुरोगामी विचारांचा चेहरा.ज्यांनी पिढ्यान् पिढ्या महाराष्ट्र धर्म जपला आणि वाढवला. अन्यायाविरोधात प्रसंगी संघर्ष करण्याची शिकवणही या महान विभूतींनी दिल्याने महाराष्ट्र भूमीला संघर्षाचाही प्रदीर्घ इतिहास आहे. म्हणून मराठी माणूस या नात्याने महाराष्ट्र धर्म जपण्यासाठी आणि टिकवण्यासाठी प्रत्येकाला संघर्षाचीही तयारी ठेवावी लागेल…”
बारामती अॅग्रो कंपनीवर केंद्रीय तपास यंत्रणेची धाड टाकल्याची सूत्रांची माहिती आहे. बारामती अॅग्रो कंपनी ही आमदार रोहित पवारांची कंपनी आहे. बारामती तालुक्यातील पिंपळी येथील बारामती अॅग्रोच्या कंपनी आहे, आज सकाळी तपास यंत्रणा येथे पोहोचली . सकाळी आठ ते साडे आठच्या दरम्यान हे अधिकारी येथे पोहोचले आहेत. तेव्हा पासून चौकशी सुरू आहे. त्याशिवाय मुंबईसह इतर ठिकाणीही धाडी मारल्या आहेत.
दरम्यान, रोहित पवार यांना गेल्यावर्षी बारामती अॅग्रो कंपनीतील कथित गैरव्यावहार प्रकरणी नोटीस मिळाली होती. याप्रकरणी रोहित पवार यांनी दोन मोठ्या नेत्यांवर निशाणा साधला होता. त्यांच्या सांगण्यावरुन माझ्या कंपनीत छापेमारी झाल्याचं ते बोलले होते.
राष्ट्रवादी काँग्रेसमून पहिल्यांदाच आमदार झालेल्या रोहित पवारांचं आतापर्यंतचे काम हे उल्लेखनीय आहे. राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर शरद पवार गटाची बाजू सांभाळत रोहित पवारांनी किल्ला लढवण्याचा प्रयत्न केला. तर अजित पवार गटाच्या प्रत्येक नेत्याने रोहित पवारांवर टीका करण्याची एकही संधी सोडली नाही. यावरून रोहित पवार हे राष्ट्रवादीत डोईजड होत होते का? त्यामुळेच दोन गट पडल्यानंतर सर्वजण त्यांच्यावर तुटून पडले का? असे काही प्रश्न पडतात.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In राजकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली!

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली! मुंबई : गेल्या महिन्याभर…