no images were found
‘रूप नगर के चीते’ १६ सप्टेंबरला चित्रपटगृहात
‘या मनातलं त्या मनाला अचूक कळतं’ असा हक्काचा कोपरा म्हणजे मैत्री…
काही गोष्टीचं मोल करता येत नाही, त्यापैकी एक म्हणजे मैत्री. मैत्री ही जीवाला जीव लावणारी असते, ती कधी हसवून जाते तर कधी डोळ्यात अलगद अश्रू देऊन जाते. दोन मित्रांमधील अशाच यारी दोस्तीची कथा सांगणारा ‘रूप नगर के चीते’ हा मराठी चित्रपट १६ सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.
या चित्रपटाची निर्मीती एस एंटरटेन्मेंट बॅनरखाली निर्माते मनन शाह यांनी केली असून दिग्दर्शन विहान सूर्यवंशी यांचे आहे. अखिल आणि गिरीश या दोन जीवलग या मित्रांच्या आयुष्यात अशा घटना घडतात की त्यामुळे त्यांच्यात दुरावा निर्माण होतो. त्यांच्यातला दुरावा मिटणार की वाढणार? याची नक्कीच उत्सुकता लागणार आहे. यासोबतच मैत्रीचे धागे जाणीवपूर्वक जपणे कसे महत्त्वाचे असतात हे सांगू पाहणारा हा चित्रपट आहे. करण परब आणि कुणाल शुक्ल हे दोन युवा कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या दोघांसोबत हेमल इंगळे, मुग्धा चाफेकर आयुषी भावे, सना प्रभु, तन्विका परळीकर, ओंकार भोजने, रजत कपूर हे कलाकार चित्रपटात दिसणार आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने मनन शाह आणि विहान सूर्यवंशी या दोघांनी मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलंय. १६ सप्टेंबरला ‘रूप नगर के चीते’ सर्वत्र प्रदर्शित होतोय.