Home शासकीय प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजनेच्या लाभासाठी कारागिरांनी निशुल्क नोंदणी करुन घ्यावी –  श्रीकांत जौंजाळ

प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजनेच्या लाभासाठी कारागिरांनी निशुल्क नोंदणी करुन घ्यावी –  श्रीकांत जौंजाळ

18 second read
0
0
24

no images were found

प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजनेच्या लाभासाठी कारागिरांनी निशुल्क नोंदणी करुन घ्यावी –  श्रीकांत जौंजाळ

 

        कोल्हापूर : प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना ही कारागिरांना लाभ मिळवून देणारी केंद्र सरकारची महत्वाकांक्षी योजना आहे. या योजनेची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी तसेच या योजनेचा लाभ कारागिरांना मोफत उपलब्ध करुन देण्यासाठी ऑनलाईन लिंक उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी कारागिरांनी नि:शुल्क नोंदणी अर्ज करण्यासाठी जवळच्या सामान्य सेवा केंद्र (CSC- COMMON SERVICE CENTER) सेंटर, महा-ई सेवा केंद्र, आपले सरकारद्वारे करावा, असे आवाहन जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी तथा विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजनेचे सदस्य सचिव श्रीकांत जौंजाळ यांनी केले आहे.

            या योजनेंतर्गत 18 प्रकारच्या विविध पारंपरिक कारागिर आणि शिल्पकारांना लाभ मिळणार आहे. कौशल्यांच्या अद्ययावतीकरणासाठी प्रशिक्षण तसेच प्रतीदिन 500 रुपये विद्यावेतन देण्यात येणार आहे. तसेच पीएम विश्वकर्मा प्रमाणपत्र आणि ओळखपत्र देण्यात येणार आहे. तसेच 3 लाख रुपयापर्यंतचे विना तारण कर्ज, 15 हजार रुपये मुल्याच्या औजारांचा संच देण्यात येणार आहे.

या योजनेची वैशिष्ट्ये- कारागिरांना विश्वकर्मा म्हणून मान्यता देणे, त्यांचे कौशल्य वाढविण्यासाठी कौशल्य वृध्दी प्रदान करणे, व्यवसाय आणि योग्य प्रशिक्षणाच्या संधी उपलब्ध करुन देणे, चांगल्या व आधुनिक साधनांसाठी सहाय्य प्रदान करणे, विनातारण आणि सवलतीच्या व्याजदरात सहज कर्ज उपलब्ध करुन देणे, डिजिटल व्यवहारासाठी प्रोत्साहन देणे, ब्रॅन्ड प्रमोशन आणि मार्केट लिंकेजसाठी एक व्यासपीठ प्रदान करणे जेणेकरुन त्यांना व्यवसाय वाढीसाठी नवीन संधी मिळणे सोईचे होईल. अधिक माहितीसाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ जिल्हा कार्यालय, कोल्हापूर दूरध्वनी क्रमांक 0231-2651271 येथे संपर्क साधावा.

Load More Related Articles

Check Also

जिल्हाधिकारी लोकशाही दिन सोमवारी

जिल्हाधिकारी लोकशाही दिन सोमवारी   कोल्हापूर, : जिल्हाधिकारी लोकशाही दिन सोमवार दि. 5…