no images were found
विवांता इंडस्ट्रीज ड्रोन आणि इव्ही व्यवसायावर आगामी काळात व्यापक स्वरूपात काम करणार !
अहमदाबाद : अहमदाबाद स्थित विवांता इंडस्ट्रीज लि. ही संकल्पनेपासून ते अंमलबजावणीपर्यंतच्या प्रकल्पांसाठी सल्लागार आणि टर्नकी सोल्यूशन्स प्रदान करते. नेक्स्ट-जेन टेक व्यवसायांवर लक्ष केंद्रित करून ऑपरेशन्समध्ये परिवर्तन करण हे कंपनीचे उद्दीष्ट आहे. ड्रोन, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, एआय आणि रोबोटिक्स, इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन यासह नवीन वर्टिकलमध्ये कंपनी काम करीत आहे. कंपनीने ड्रोन आणि ईव्ही व्यवसायावर आधीच काम सुरू केले असून आगामी काळात ते अधिक व्यापक स्वरूपात करण्याचा त्यांचा हेतू आहे.
सप्टेंबर २०२३ मध्ये, कंपनीने विवांता ड्रोन रिसर्च सेंटर टांझानिया लि. शी मुख्य सामंजस्य करार (MOU) केला. विवांता इंडस्ट्रीज लि. मधील असेम्ब्ली लाईन तसेच ड्रोनच्या विकास आणि संशोधनसाठी ५० टक्के स्टेक घेणार आहे. कंपनीला आफ्रिकन खंडातून मोठ्या प्रमाणात व्यवसाय संधीची अपेक्षा आहे आणि प्रकल्पाला गती मिळेल. पुढे एप्रिल २०२३ मध्ये, कंपनीला इव्ही चार्जिंग आणि मॅन्युफॅक्चरिंग युनिट स्थापन करण्यासाठी इलेक्ट्रिक व्हेईकल ऑर्गनायझेशनल सेंटर नॉर्थ अमेरिका कॉर्पोरेशनकडून यूएसडी ५ दशलक्ष रकमेचा कार्यादेश मिळाला. कंपनी १८-२४ महिन्यांत प्लांट स्थापन करेल आणि ऑर्डर मिळाल्याच्या तारखेपासून ६ ते १२ महिन्यांत त्यासाठी लागणाऱ्या आवश्यक सॉफ्टवेअरची स्थापना करेल. हा आदेश इलेक्ट्रिक वाहन तंत्रज्ञानाच्या व्यावसायिकीकरणासाठी आहे, ज्यात वाहन-टू-ग्रीड, वाहन-टू-बिल्डिंग आणि वाहन-टू-लोड क्षमता समाविष्ट आहेत. तंत्रज्ञानाचे प्रमाणीकरण करून आणि अशा तंत्रज्ञानाची व्यावसायिक व्यवहार्यता प्रदर्शित करून प्रकल्प स्थापन केल्यानंतर कंपनीला अंदाजे यूएसडी १० दशलक्ष आणि त्याहून अधिक किमतीची विक्री होण्याची अपेक्षा आहे.
१३ फेब्रुवारी २०२३ रोजी झालेल्या कंपनीच्या अतिरिक्त सर्वसाधारण सभेत, कंपनीच्या सदस्यांनी मेमोरँडम ऑफ असोसिएशनच्या ऑब्जेक्ट क्लॉजमध्ये सुधारणा करण्यास मान्यता दिली होती. ज्यामुळे कंपनीला कृषी आणि पशुखाद्य, औद्योगिक ऑटोमेशन, यासह अनेक व्यवसायांमध्ये प्रवेश करण्याची परवानगी दिली होती. सन २०१३ मध्ये स्थापित,विवांता इंडस्ट्रीज लि. ही एक नागरी बांधकाम आणि अभियांत्रिकी कंपनी असून जमीन सर्वेक्षण आणि खरेदी, प्रकल्प डिझाइनिंग, आर्थिक अभ्यास, वित्तपुरवठा आणि विपणन सेवा यासह अनेक सेवा प्रदान करते. कंपनीने विशेषत: फार्मास्युटिकल्स, कृषी आधारित खत प्रकल्प, औद्योगिक उद्यानांमध्ये टर्नकी प्रकल्प कार्यान्वित केले आहेत. कंपनीचे शेअर्स बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजवर सूचीबद्ध आहेत.
सप्टेंबर २०२२ मध्ये कंपनीला गुजरातमध्ये बायोगॅस प्रकल्प आणि औद्योगिक पार्क उभारण्यासाठी ३७ कोटी रुपयांचे टर्नकी कंत्राट देण्यात आले. कंपनी नजीकच्या काळात साबरकांठा जिल्ह्यात बायोगॅस प्रकल्प सुरू करणार असून बनासकांठा आणि उत्तर गुजरातमध्ये ४० मेट्रिक टन क्षमतेच्या बायोगॅस प्रकल्पांवर काम सुरू करण्याची अपेक्षा आहे. या प्रकल्पांची एकूण किंमत १२ कोटी रुपये आहे. कंपनीने २०२४ च्या पहिल्या सहामाहिसाठी एकूण उत्पन्नात अनेकपट वाढ नोंदवली. २०२३ च्या पहिल्या सहामाहित ०.९० कोटींच्या तुलनेत २०२४ च्या सहामाहिसाठी २३.०३ कोटींचे कंपनीने उत्पन्न मिळवले.तर २०२४ च्या पहिल्या सहामाहित कंपनीने १.०१ कोटी रुपये निव्वळ नफा मिळवला. ही वाढ ४७ % ची आहे.