
no images were found
खोळंबा आकार कमी केल्याबद्दल राजेश क्षीरसागर यांचा रेणुका भक्तांनी केला सत्कार
कोल्हापूर (प्रतिनिधी): उदं ग आई उदं च्या गजरात आणि भक्तीमय वातावरणात आज कोल्हापुरातील विविध भागातून सौदत्ती यात्रेसाठी यल्लमा डोंगराकडे भाविक रवाना होत आहेत. मंगळवार पेठेतील मोहिते घोरपडे इंगवले रेणुका भक्त मंडळाच्या वतीने देखील आज सकाळी महाराष्ट्र परिवहन बसमधून भाविक रवाना झाले यावेळी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष यांनी एसटी भाडे आणि खोळंबा आकाराचा प्रश्न निकाली काढल्याने रेणुका भक्त मंडळाचे पदाधिकारी आणि भाविकांनी राजेश क्षीरसागर यांचा जाहीर सत्कार केला.
प्रत्येक वर्षी कर्नाटकातील सौंदत्ती यात्रेसाठी लाखो भाविक यल्लमा डोंगरावर जात असतात.आज सकाळी मंगळवार पेठेतील मोहिते घोरपडे इंगवले रेणुका फक्त मंडळाच्या एसटी गाड्या रवाना झाल्या राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते नारळ वाढवून या गाड्या यल्लमा डोंगराकडे रवाना झाले आहेत. सौंदत्ती यात्रेला शक्यतो एस टी तूनच लाखो भाविक जात असतात.मात्र एसटीचे जादा भाडे आणि खोळंबा आकार यामुळे भाविकांना आर्थिक भुर्दंड पडत होता राजेश क्षीरसागर यांनी 2009 सालापासून लक्ष घालून एसटी भाडे आणि खोळंबा आकार कमी केला. त्यामुळे सौंदत्ती यात्रेसाठी जाणाऱ्या भक्तांची यात्रा सुखकर होण्यासाठी मदत झाली.यावेळी भाविकांचा खोळंबा आकार आणि ज्यादा भाड्याचा प्रश्न निकाली काढला यासाठी अभर म्हणून यल्लमा भक्तांनी राजेश क्षीरसागर यांचा सत्कार करून आभार मानले.खोळंबा आकार आणि ज्यादा भाडे याबाबत भाविकांमध्ये मोठी संभ्रमावस्था निर्माण झाली होती.सन २००९ पासून वारंवार याबाबत राज्य सरकार आणि परिवहन मंडळाकडे पाठपुरावा करून भाविकांचा हा प्रश्न मार्गी लावळ .त्यामुळे भाविकांची सौंदत्ती यात्रा सुखकर होणार याचे समाधान वाटत असल्याची प्रतिक्रिया यावेळी क्षीरसागर यांनी व्यक्त केली. यावेळी रेणुका भक्त मंडळाचे अध्यक्ष सुनील मोहिते, उपाध्यक्ष पांडुरंग इंगवले,सचिव सुभाष मोहिते यांच्यासह मोहिते घोरपडे इंगवले रेणुका भक्त मंडळाचे पदाधिकारी आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.